Trailer for ‘Miranda Warning’ released! : चित्रपट पाहताना प्रत्येक दृश्यात पुढे काय घडणार, कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं, गुन्हेगार नेमका कोण, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात प्रेक्षकांना जी मजा मिळते, तोच अनुभव देण्यासाठी आता मराठी चित्रपटसृष्टीत ‘मिरांडा वॉर्निंग’ हा नवा सस्पेन्स क्राईम थ्रिलर दाखल होत आहे. या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यातील रहस्यमय वातावरण आणि गुंतागुंतीच्या कथानकाने चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण केली आहे.
सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर हा चित्रपटप्रकार प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची कथा सांगताना त्यामागील मानसिकता, मानवी नाती, संशय आणि सत्याचे वेगवेगळे पैलू उलगडणे हेच अशा चित्रपटाचे खरे वैशिष्ट्य असते. ‘मिरांडा वॉर्निंग’ याच धाटणीचा एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव घेऊन येत आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज मार्फत “मिरांडा वॉर्निंग” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे तर अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटच्या सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रच्या कल्पक जोशी यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. त्यांनी या पूर्वी 2023 मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यानंतर ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटातून त्यांनी वेगळा प्रयोग केला आहे. रवींद्र मठाधिकारी, सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. अभिनेता आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण, इरिना राय, एकनाथ गीते, त्रिशा, निलेश गवारे, इम्रान तांबोळी या कलाकारांचा दमदार अभिनय आपल्याला या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रीपदासाठी हपापलेले दोन–चार लोक; विलीनीकरणावर संजय राऊतांचा इशारा
चित्रपटाची कथा एका रिसॉर्टमध्ये घडणाऱ्या रहस्यमय घटनेभोवती फिरते. दोन जोडपी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत, अचानक घडलेली हत्या आणि त्यानंतर सुरू होणारा पोलिस तपास… या सगळ्या घटनांमधून संशयाचे जाळे अधिकाधिक घट्ट होत जाते. प्रत्येक पात्राची एक वेगळी बाजू समोर येते. प्रत्येकाच्या बोलण्यात काहीतरी लपलेले असल्याची जाणीव होते. त्यामुळे नेमके सत्य काय आणि या प्रकरणामागील खरा चेहरा कोणता, याचा शोध घेणे हेच या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.या तपासाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तक यांच्यावर आहे. आपल्या अनुभवातून गुन्ह्यांची उकल करणाऱ्या या अधिकाऱ्यासमोर मात्र हे प्रकरण अनेक प्रश्न उभे करते. पुरावे, जबाब आणि घटनाक्रम यांची सांगड घालत सत्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे, ‘मिरांडा वॉर्निंग’ केवळ खुनी कोण आहे याभोवती फिरत नाही, तर कायद्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष न्याय यातील फरक अधोरेखित करणारा विचारही मांडतो. एखाद्या घटनेकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून पाहायचे की त्यामागील परिस्थिती आणि वास्तव समजून घ्यायचे, असा महत्त्वपूर्ण प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवतो.
आता AI करणार सायबर हल्ल्यांपासून बचाव; OpenAI ने लाँच केले पॉवरफुल सिक्युरिटी टूल्स
ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची केवळ एक झलक समोर आली असली, तरी संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात जावे लागणार आहे. विशेषतः सस्पेन्स क्राईम थ्रिलर आवडणाऱ्या आणि चित्रपट पाहताना स्वतःच गुन्हेगाराचा अंदाज बांधणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘मिरांडा वॉर्निंग’ हा एक उत्सुकतापूर्ण पर्याय ठरणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत असताना, सस्पेन्स आणि क्राईमच्या माध्यमातून वेगळा आशय मांडणारा हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Trailer Link
