Marathi Movie : ‘घर, बंदूक, बिरयानी’चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला !

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. आता या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. View this post on Instagram A post shared by […]

Ghar Banduk Biryani 3jpeg

Ghar Banduk Biryani 3jpeg

मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. आता या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यामध्ये चकमक होत आहे. मात्र याचं कारण काय त्यात एक तरूणही दिसत आहे. पण याचा सर्व संदर्भ प्रेक्षकांना चित्रपट रिलीज झाल्यानंतरच लागणार आहे. त्याचबरोबर स्वतः नागराज मंजुळेही चित्रपटात अॅक्शन करताना दिसणार आहे. तर सयाजी शिंदेंचा रावडी आणि आकाश ठोसरचा रोमॅंटीक अंदाज दिसणार आहे. यात कौटुंबिक कथाही दडली आहे. यात प्रेमकहाणीही बहरत आहे.

या अगोदर या चित्रपटातील ‘गुन गुन’हे गाणं मराठी, तेलुगू आणि तामिळ भाषेतही आपल्या भेटीला आलं आहे. तेलुगूमध्ये हे गाणं चंद्रबोस यांनी लिहिलं आहे. तर तामिळमध्ये युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे. अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांनी गायलं असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. तर मराठीत हे गाणं आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलं असून वैभव देशमुख यांनी लिहिलं आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे.

Marathi Movie : ‘घर बंदूक बिरयानी’मधील गाणं तेलुगू, तामिळमध्ये प्रदर्शित

या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच नागराजसोबतच सयाजी शिंदे, आकाश ठोसर हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज आणि हेमंत आवताडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामध्ये आता या चित्रपटाचा ट्रेलर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version