Download App

72 Hoorain Trailer Out : सेन्सॉर बोर्डाचा विरोध असताना ’72 हुरैन’चा ट्रेलर प्रदर्शित

72 Hoorain Trailer Out : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर आता ‘७२ हुरैन’ (72 Hoorain) हा चित्रपट आता चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ब्रेनवॉश करुन निष्पाप लोकांना कसं दहशतवादी संघटनेमध्ये एकत्र करुन घेतलं जातं, यावर महत्वपूर्ण भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने (CBFC) या चित्रपटाच्या ट्रेलरवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत, तरीदेखील या चित्रपटाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘७२ हुरैन’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये निष्पाप लोकांचं ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये एकत्र केल्याचे बघायला मिळाले आहे. दहशतवादी संघटनेमध्ये एकत्र केल्यानंतर त्यांचा कसा जीव घेतला होता. या चित्रपटामध्ये दहशतवादी म्हणत आहेत की,”जो व्यक्ती जीव देऊन लोकांच्या जाळ्यात अडकतो, त्याला जन्नतमध्ये जागा मिळते, असे दहशतवाद्यांचे मत आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते लोकप्रिय दिग्दर्शक संजय पूरन सिंह यांनी ‘७२ हुरैन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘७२ हुरैन’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट खूपच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘७२ हुरैन’ हा चित्रपट १० भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. ७२ तरुण मुलींचं ब्रेनवॉश करुन त्यांना कोणत्या पद्धतीने मारले जाते हे बघत असताना अंगावर शहारे येतात. ‘७२ हुरैन’ हा चित्रपट इंग्लिश, मराठी, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगली, पंजाबी, भोजपुरी, कश्मीरी व आसामी या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

‘७२ हुरैन’चा विषय गंभीर असल्याने हा चित्रपट १० भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा मोठा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. कोणाच्या भावना दुखावायचे नाही, हा आमचा महत्वाचा हेतू असणार आहे, तसेच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us