‘मास्तरिन बाई, नाही तर आम्हीच शिकवू चांगला धडा!’ मृणाल कुलकर्णींनी सून शिवानीला भरला दम…

Tula Shikvin Changala Dhada : झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेली तुला शिकवीन चांगला धडा ( Tula Shikvin Changala Dhada) या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणजेच मास्तरीन बाई. शिवानी ही खऱ्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची सून आहे. त्यामुळे या मालिकेच्या दरम्यान सासू म्हणून मृणाल यांनी सून शिवानीला कौतुकाची […]

Tula Shikvin Changala Dhada 'मास्तरिन बाई, नाही तर आम्हीच शिकवू चांगला धडा!' मृणाल कुलकर्णींनी सून शिवानीला भरला दम...

Tula Shikvin Changala Dhada

Tula Shikvin Changala Dhada : झी मराठी या वाहिनीवर सुरू असलेली तुला शिकवीन चांगला धडा (
Tula Shikvin Changala Dhada) या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणजेच मास्तरीन बाई. शिवानी ही खऱ्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni) यांची सून आहे. त्यामुळे या मालिकेच्या दरम्यान सासू म्हणून मृणाल यांनी सून शिवानीला कौतुकाची थाप देत, दम देखील भरला आहे.

मोठी बातमी! शरद पवार गटाला नवं नावं मिळालं; ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’

त्यावेळी मृणाल यांनी फेसबुकवर शिवानी सोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये साडीमध्ये असलेल्या या सासु सुनांची जोडी अत्यंत उठून दिसत आहे. मात्र या फोटोला कॅप्शन देताना मृणाल यांनी लिहिलं की, मास्तरीन बाई, काम झक्कास करताय. पण खाणं, पिणं, तब्येत पण सांभाळा. नाहीतर आम्हीच शिकवू चांगला धडा. असं म्हणत मृणाल यांनी शिवानीच्या कामाबद्दल तिचं कौतुकही केलं आहे. तसेच तिला आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे सांगताना. त्यांनी तिला खाणं, पिणं, तब्येत सांभाळा नाहीतर आम्ही शिकवू चांगला धडा. असे म्हणत दम भरला आहे.

सध्या सुरू असलेली शिवानीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ज्यामध्ये शिवानीने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. यामध्ये तिचं एका श्रीमंत घरामध्ये लग्न होतं. मात्र तिची सासू भुवनेश्वरी हिला शिक्षणाचा प्रचंड तिरस्कार असतो. आता अशा वातावरणामध्ये शिवानी म्हणजेच मालिकेतील अक्षराने तिच्या पतीला म्हणजेच अधिपतीला शिकवण्याचा विडा उचलला आहे.

Kuch Khatta Ho Jaaye Trailer : गुरू रंधावाचं अभिनयात पदार्पण, सई मांजरेकरसोबत रोमॅंटीक अंदाजात दिसणार

तर गेल्या काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा अभिनेता विराजस कुलकर्णी हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे या सासू सूनांची जोडी एकत्र पाहायला मिळाली आहे.

Exit mobile version