Kuch Khatta Ho Jaaye Trailer : गुरू रंधावाचं अभिनयात पदार्पण, सई मांजरेकरसोबत रोमॅंटीक अंदाजात दिसणार

Kuch Khatta Ho Jaaye Trailer : गुरू रंधावाचं अभिनयात पदार्पण, सई मांजरेकरसोबत रोमॅंटीक अंदाजात दिसणार

Kuch Khatta Ho Jaaye Trailer : कुछ खट्टा मीठा हो जाये (Kuch Khatta Ho Jaaye Trailer) या चित्रपटातून प्रसिद्ध गायक गुरु रंधावा (Guru Randhava) आपलं अभिनय क्षेत्रातील करियर सुरू करत आहे. त्याच्या पहिल्या महिला चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटांमध्ये महेश मांजरेकर यांची मुलगी सही मांजरेकर ही गुरुसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पक्ष आणि चिन्ह गेल्यानं नाउमेद होऊ नका; निष्ठावंत जनता…; जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना बळ

या चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसत आहे की, हा चित्रपट दोन लव बर्ड्सच्या अवतीभवती फिरणारा आहे. ज्यामध्ये एक कपल लग्न करतं. मात्र त्यांना अपेक्षित नसताना सई गरोदर राहते. नंतर कळतं की हे खोट आहे. चित्रपटामध्ये गुरुने हिरा तर सई मांजरेकर ने राणी ही भूमिका साकारली आहे. हिरा हा एक मनमौजी मुलगा आहे. तर राणी आयएस अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करत असते. मात्र पुढे काय होतं हे आता चित्रपट रिलीज झाल्यावरच कळणार आहे.

Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

हा चित्रपट 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अशोक यांनी केला असून विजयपाल सिंह यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर अमित भाटिया आणि लवीना भाटिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटामध्ये गुरु आणि सई यांच्यासोबतच इला अरुण, अतुल श्रीवास्तव, परेश गणात्रा आणि परितोष त्रीपाठी यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

गुरु रंधावाला या अगोदर लाहोर, पटोला, तेनु सुट सुट करता आणि बन जा तू मेरी रानी या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली आहे. त्यानंतर तो आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर सही मांजरेकर मराठीनंतर आता हिंदीतही आपल्या अभिनयाची जादू आजमावत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube