पक्ष आणि चिन्ह गेल्यानं नाउमेद होऊ नका; निष्ठावंत जनता…; जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांना बळ
Jayant Patil : काल निवडणूक आयोगाने शरद पवारांना (Sharad Pawar) मोठा धक्का दिला. आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्हांवर अजित पवारांचा हक्क असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सैरभैर वातावरण आहे. अशातच आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. पक्ष गेल्यानं, चिन्हगेल्यानं नाउमेद होऊ नका, आजही निष्ठावाण जनता आपल्यासोबत आहेत, अशा शब्दात पाटील यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं.
Pratap Dhakane : अजितदादा स्वार्थी पण पवारांचं काही अडत नाही, म्हणत ढाकणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
नगरमध्ये आज शरद पवार गटाचा मेळावा झाला. यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, येणाऱ्या दक्षिण लोकसभा निवडणुकीची चर्चा करण्यासाठी मी आलोय. कारण, येणारी लोकसभा आपल्याला लढवायची आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप आपण उमेदवार ठरवलेले नाहीत. मात्र, शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी आपण ताकदीने काम करणार आहोत, असं ते म्हणाले.
आयोगाचा निकाल हा पूर्णपणे चुकीचा
निवडणुक आयोगाच्या निकालावरही पाटील यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, दोन महिन्यापूर्वी सुनावणी संपल्यानंतर काल निवडणुक आयोगाने काल पक्ष चिन्हाचा निकाल जाहीर केला. आयोगाने दिलेला निकाल हा पूर्णपणे चुकीचा आहे, अशी भावना जनमाणसात तयार झाली. महाराष्ट्रभर आणि देशभर लोक नाराजी व्यक्त करत आहे. या निकालाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असून देशाचे सर्वोच्च न्यायालाय आम्हाला न्याय देईल खात्री आम्हाला आहे, असं पाटील म्हणाले.
‘चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं’; NCP च्या निर्णयावर ठाकरेंची बोचरी टीका
पाटील म्हणाले, जर नाईलाज काही निर्णय झाला नाही, तर आपल्याला नव्या नावाने आणि नव्या चिन्हाने निवडणूक लढवावी लागेल. आज आपल्याच बरोबरचे लोक सत्तेत जाऊन बसलेत. मात्र जनमाणसातील शरद पवारांविषयीची निष्ठा कायय आहे. त्यामुळं नाऊमेद होण्याची गरज नाही.
केंद्रावर टीका
पाटील म्हणाले, देशाच्या आर्थिक परिस्थिती धोक्यात येईल एवढं कर्ज देशावर आहे. देशांमध्ये सामाजिक विषमता निर्माण झाली आहे. जातीजातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे. येणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी द्वेषाचं वातावरण तयार केले जात आहे, अशी टीका त्यांना भाजपवर केली. देशात बेकारीचे प्रमाण वाढले आहे. नवीन उद्योग या ठिकाणी यायला तयार नाही आहे. श्रीलंकेसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. या सगळ्याला मोदी सरकार जबाबदार आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्राचे गुंडांसोबतचे फोटो हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या अधोगतीकडे नेणारे उदाहरण आहे. गुंडगिरी करणारे राजकारणात आले,अशी टीका पाटील यांनी केली. यावेळी राजेंद्र फाळके, प्राजक्त तनुपुरे, मेहबुब शेख, प्रतापकाका ढाकणे, अभिषेक कळमकर, दादा कळमकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.