‘चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं’; NCP च्या निर्णयावर ठाकरेंची बोचरी टीका
Udhav Thackeray on BJP : चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.
काँग्रेसचीच गॅरंटी नाही अन् माझ्या गॅरंटीवर प्रश्न..,; PM मोदींची जहरी टीका
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाकडून काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात निर्णय देण्यात आला आहे. हा असा निकाल अपेक्षितच होता, निवडणूक आयोगाने तसा निकाल दिला नसता तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयासारखाचं हातोडा मारला असता. खोटी कागदपत्रे तयार करुन चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं.
त्यांनी बलात्कार, खून, दरोडे करणाऱ्यांना सोडून दिलं नाही. आता एवढीही नैतिकता भाजपमध्ये राहिली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Ahaan Panday : अभिनेत्याचं बॉलीवूडमध्ये पदार्पण! मोहित सुरीसोबत शेअर करणार स्क्रीन
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर जळजळीत टीका केली आहे.
Fighter Movie: दीपिका अन् हृतिक वादाच्या भोवऱ्यात; ‘या’ कारणामुळे मिळाली कायदेशीर नोटीस
दरम्यान, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला. आयोगाच्या या निकालावर विरोधकांनी आगपाखड सुरू केली आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत आयोग आणि मोदी-शाहांवर घणाघाती टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.