‘त्या’ रात्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदमांची जहरी टीका

‘त्या’ रात्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदमांची जहरी टीका

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते का? पण या उद्धव ठाकरेंना सत्ता हवी आहे. मुख्यमंत्रीपद हवे होते म्हणून पक्ष संपवला, असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केला.

ते पुढे म्हणाले की, ही व्यक्ती प्रमोद नवलकर यांच्या कॉललाही उत्तर देत नव्हती. नवलकरांच्या मुलीला जाऊन विचारा. उद्या राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे. नवलकर साहेब गेल्यावर त्यांच्या मुलीला चालते व्हा म्हणून सांगितलं. आता इथे का आलात, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी जाहीर सभेत केला.

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार अन् दिल्लावाल्यांना महाराष्ट्राचं पाणी…; उद्धव ठाकरेंचा इशारा

या माणसाने मनोहर जोशींसारख्या नेत्याला मंचावरून खाली उतरायला लावलं. अपमान केला. लीलाधर डाकेंना वर्षा बंगल्यावर तीन तास बसवून ठेवले. भेट दिली नाही. सुधीर जोशी यांचे काय झाले हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. रामदास कदमला बाजूला करून स्वत:च्या मुलाला मंत्री करण्यात आले. दिवाकर रावते यांचे मंत्रीपद व आमदारकी काढून घेण्यात आली. उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांची अशी अवस्था केली, अशी टीका रामदास कदम यांनी दापोली पालगड सभेतून केली.

काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना संपवलं आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांना संपवण्याचे पाप उद्धव ठाकरेंनी केले आहे, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज