Uorfi Javed: उर्फी जावेद हे नाव सोशल मिडियावर (Social media) सध्या जोरदार चर्चेत आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी तिच्या फॅशनने सर्व चाहत्यांना थक्क करत असते. विचित्र फॅशनचा (fashion) नमुना सादर करण्यासोबतच ती काही मुद्यावर तिचे मत देखील माडंत असताना दिसून येत असते. याबरोबरच तिच्यावर टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देखील ती नेहमी देत असते.
उर्फी जावेद जिथे जाईल तिथे ती सर्वाचे लक्ष वेधत असते. उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ती नेहमी ट्रोल देखील होत असते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता हे चाहत्यांसाठी काहीतरी वेगळेपण आहे. ती तिच्या मुद्यावर नेहमी ठाम असते. तिला तिच्या ड्रेसमुळे अनेकदा ट्रोल देखील केलॆ जाते.
अलीकडेच उर्फीने सोशल मीडियावर शेअर केले की तिला तिच्या कपडे घालण्याच्या शैलीमुळे मुंबईतील रक्त हॉटेलमध्ये प्रवेश दिला गेला नाही. उर्फी जावेदला एका हॉटेलमध्ये एंट्री देण्यात आली नाही. यामुळे ती संतापली आणि तिने आपला राग सोशल मीडियावर काढला आहे. तिच्या फॅशन सेन्सशी सहमत नसेल तर तिच्याशी वेगळं वागणं चुकीचे असल्याचे ती म्हणाली.
या घटनेनंतर त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट टाकली आहे, जी व्हायरल झाली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘मुंबई, हे खरंच 21 वे शतक आहे का? आज मला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. तिने पुढे लिहिले आहे की, ‘तुम्हाला माझी फॅशन आवडत नसेल तर ठीक आहे, पण त्यामुळे माझ्याशी असं वागणे योग्य नाही आणि जर तुम्ही तसं केलं तर ते स्वीकारा. खोटे कारण सांगू नका, अशी पोस्ट उर्फी जावेदने व्हिडिओ शेअर करत Zomato ला टॅग केले आहे.
यावरून उर्फी जावेदला झोमॅटोच्या हॉटेलमध्ये एंट्री देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंबधित तिचा हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती कार मधुन उतरते आणि रेस्टॉरंटमध्ये जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र तेथील व्यक्ती तिला आत जाण्यापासून थांबवतो आणि उर्फी त्याच्यावर खुप संतापते. इतकच नाही तर ती त्याला धमकी देखील देत असल्याचे दिसून येत आहे.