Download App

Urfi Javed इंस्टाग्राम बंद करणार; पोस्ट करत स्वतःच सांगितलं कारण…

  • Written By: Last Updated:

Urfi Javed : आपल्या वेगवेगळ्या फोटोसेशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) आता पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी आता थेट तीने तिचं इंस्टाग्राम अकाउंट बंद करणार असल्याचे माहिती तिने दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. मात्र यामधील कारण देखील यावेळी तिने इंस्टाग्राम वरच पोस्ट करत सांगितला आहे.

School Time : बच्चे कंपनींसाठी गुड न्यूज! आता सकाळच्या साखर झोपेत ‘नो डिस्टर्बन्स’; केसरकरांची मोठी घोषणा

उर्फीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यामध्ये ती म्हणाली की, माझं इंस्टाग्राम अकाउंट गेल्या काही दिवसांपासून एरर दाखवत आहे. गेल्या आठवड्यात ते दोनदा बंद करण्यात आलं. तर तांत्रिक अडचणीमुळे मला मी केलेल्या पोस्ट या आक्षेपार्ह असल्याबद्दलच्या सूचना येत आहेत. त्यामुळे त्या पुन्हा पोस्ट केल्या जाव्यात. मात्र पुन्हा पोस्ट केल्यास देखील तशाच प्रकारचे नोटिफिकेशन येत आहे. त्याचबरोबर पोस्ट केल्यानंतर माझ्या फॉलोवर्सची संख्या देखील कमी होत आहे. असं उर्फी म्हणाली आहे.

Omi Vaidya : ‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ विनोदी चित्रपटाचा टीझर रिलीज

फॅशन जगतातील एक चर्चेत असलेली व्यक्ती उर्फी जावेद. तिच्या फॅशन मुळे ती कायम चर्चेत असते. या सगळ्या प्रकारात सोशल मीडियावर अनेक कॉमेंट्स येत असून चाहत्यांनी तिच्या नवीन खात्याबद्दल संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Fighter: ‘बँग बँग ते फायटर’ सिद्धार्थ आनंद अन् हृतिक रोशनचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार !

उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड (Bollywood) सिनेमात झळकणार असल्याची चर्चा सध्या सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाल्याची माहिती मिळत आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे.

एकता कपूरच्या आगामी ‘लव्ह सेक्स और धोका 2’ (Love Sex Aur Dhokha 2) या सिनेमासाठी उर्फी जावेदला विचारणा झाली आहे. या सिनेमामध्ये उर्फी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून उर्फी आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. उर्फी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags

follow us