Omi Vaidya : ‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ विनोदी चित्रपटाचा टीझर रिलीज

Omi Vaidya : ‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ विनोदी चित्रपटाचा टीझर रिलीज

Omi Vaidya In Marathi Movie: थ्री इडीयट्स (3 Idiots) या ब्लॉकबस्टर बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने (Omi Vaidya) चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर चाहत्यांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. ‘तर मग आता ओमीची मुख्य भूमिका असलेला, टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ (Aaichya Gavat Marathit Bol) हा धम्माल विनोदी चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaichya Gavat Marathit Bol (@aaichyagavatmarathitbol)

ओमी वैद्यच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाच्या गणेश उत्सवातील नाटकाने झाली होती. अभिनयावरील प्रेमापोटीच ओमीने अमेरिका ते भारत हा मोठा प्रवास केला. ओमीने ‘चतुर’ या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून हिंदी भाषिकांमध्ये आपला असा चाहता वर्ग याआधीच निर्माण केला आहे. आणि आता मराठी प्रेक्षकांचे मन जिंकण्याचे मोठं चॅलेंज त्याने स्वीकारलं आहे. पहिल्याच मराठी सिनेमात तो दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू चोख सांभाळत ओमीने मराठीतील दिग्गज कलाकारांच्या साथीने अभिनयाची देखील उत्तम छाप सोडल्याचे टिजर मधून दिसत आहे. टिजरमध्ये इतर मराठी कलाकारांसोबतचा त्याचा वावर एकदम सहज वाटतो आहे.ओमी आणि त्याच्या संचातले सगळे गुणी कलाकार प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरतील याबाबत शंका वाटत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaichya Gavat Marathit Bol (@aaichyagavatmarathitbol)


चित्रपटाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून भारतात आल्यावर अनपेक्षित वळणांचा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकते का ? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकतील काय ? ह्या सगळ्या प्रश्ननांची उत्तरं समरला गवसतातच ,पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं ह्याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो तसाच त्याचा हा प्रवास प्रेक्षकांनाही भावेल.

या चित्रपटाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. जलदीप दलूत , पीट टॉरमे, नंदिनी मिनॉशे, समिया अश्रफ, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, माँटी आणि तनु पांडे, संतोष गोविंदाराजू, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, जसलीन अहलुवालिया राजन वासुदेवन,राजीव आणि शीतल शाह,संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे.

‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; ‘आईच्या गावात मराठीत बोल’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल नितांत आदर असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर ह्यांनी अमेरिकेतच ह्या चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली. अमेरिकेतूंनच त्यांनी दोघांनी संचबांधणी सुरु केली.सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.संगीत आणि पार्श्वसंगीत – अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे तसेच या चित्रपटाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे .

‘आईच्या गावात मराठीत बोल’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष, सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत. ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करतोय आणि सोने पे सुहागा म्हणजे दिग्दर्शक म्हणूनही त्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याने रसिक प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube