उर्फी जावेदच्या ट्विटवर भरलं कवी संमेलन

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय. उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी […]

Untitled Design

Untitled Design

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय.

उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी कशी गं तू सास”. आणि उर्फीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी अक्षरक्ष: कमेंटचा पाऊसच पाडला. नंतर कमेंट बॉक्समध्ये कवी संमेलनच भरलं असं वाटू लागलं.

उर्फीच्या मराठी ट्विटनंतर नेटकऱ्यांमध्ये यमक जुळवण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येतंय. जो करेल नाद उर्फीचा…! भरवा तिला घास खोबऱ्याच्या बर्फीचा…! जानेवारीत थंडीने पुणे गाठवले, उर्फिची कविता बघून “रामदास” आठवले..!!

एक नेटकरी तर लिहितो, उर्फीला दिला त्रास, चित्राचा खेळ खल्लास. देऊ नको त्रास होईल तुझी खास अशा अफलातून कमेंट नेटकऱ्यांनी दिल्यात.
काहींनी तर सोज्वळ सासू खट्याळ सून, सासू नंबरी सून दस नंबरी अशा आशयाचे थेट चित्रपटाचे पोस्टरच शेअर केलेत.

Exit mobile version