Download App

भारत-पाक सामना पाहण्यासाठी गेलेल्या उर्वशीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला

Urvashi Rautela Phone: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rotaila) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना पाहण्यासाठी गेली होती. यादरम्यान उर्वशीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती तिनेच आता सोशल मीडियावर दिली आहे.

24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला
काल रात्री उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर या अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन स्टेडियममधून गायब झाला. उर्वशीने तिच्या एक्स (पूर्वीचे ट्विटरवर) ही माहिती दिली आहे.

यामध्ये तिने अहमदाबाद पोलिसांना टॅग केले आणि लिहिले, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेटचा आयफोन हरवला आहे. कृपया, कोणाला ते सापडल्यास, कृपया ताबडतोब संपर्क साधा…” आता उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट देखील शेअर केली आहे.

हर्षवर्धन जाधव पुन्हा विवाहबद्ध; दोन महिन्यांपूर्वी विषय संपलेल्या ‘ईशा झा’ सोबतच बांधली लग्नगाठ

उर्वशीने स्टेडियमधील व्हिडिओ शेअर केला
यापूर्वी उर्वशी रौतेलाने तिच्या स्टेडियममधील एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती भारताची विजयाकडे वाटचाल करताना खूप आनंदी दिसत आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी ही अभिनेत्री निळ्या रंगाचा ड्रेस घालून स्टेडियममध्ये पोहोचली. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याआधीही उर्वशी अनेकदा मॅच पाहताना स्पॉट झाली आहे.

World Cup 2023 : श्रीलंकेला धक्का! कर्णधारच वर्ल्डकपमधून बाहेर; कारणही आले समोर

दरम्यान उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. त्यांच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. लवकरच ही अभिनेत्री काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


follow us