Download App

Uut Movie : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चित्रपटाचा गौरव

श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही ऊत या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे.

Uut Marathi Movie : ‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजतोय. कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे. ‘ऊत’ ला मिळत असलेला प्रतिसाद व विविध पुरस्कारांची पोचपावती भारावणारी आहे. चित्रपटाच्या माध्यमातून बोधप्रद गोष्ट सांगण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाल्याची ही पावतीच आहे असे मुख्य अभिनेते आणि निर्माते राज मिसाळ आवर्जून नमूद करतात.

व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी (Uut Marathi Movie) सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच ‘ऊत’ मध्ये एक प्रेमकथाही आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये अजिंक्य देव यांच्या दोन चित्रपटाचा प्रिमियर; पाहा फोटो

या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ (Raj Misal) असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने (Marathi Cinema) ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या वर्षाअखेर ‘ऊत’ चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मलेशिया फिल्म फेस्टिव्हल, ईस्टर्न युरोप फिल्म फेस्टिव्हल, ईस्ट विलेज न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल, सिनसिने फिल्म फेस्टिव्हल,श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मँचेस्टर फिल्म फेस्टिव्हल, अहमदाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या सारख्या अनेक देशी-विदेशी चित्रपट महोत्सवात ‘ऊत’ या मराठी चित्रपटाने आपली यशस्वी मोहोर उमटविली आहे .चित्रपट प्रदर्शनापूर्वीच विविध महोत्सवांमध्ये दखल घेतलेला ‘ऊत’ मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच वेगळा प्रयत्न ठरेल यात शंका नाही.

मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचं जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

follow us