Download App

गाणं कडकडीत…प्रेम झणझणीत; ‘वडापाव’ चं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला…

प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

Vadapav Movie : मराठी चित्रपटसृष्टीत वडापावसारखीच चव आणणारा झणझणीत प्रेमावर आधारित वडापाव (Vadapav Movie ) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातलं गाणं कडकडीत…प्रेम झणझणीत टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

अजित पवारांना भिडलेल्या अंजना कृष्णा कोण?, काय करतात आई-वडील?, कुठ अन् कसं झालं शिक्षण

प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे, तसंच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडतंय. गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल–करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा दमदार आवाज. यामुळे या गाण्याची रंगतदार रेसिपी तयार झाली असून ती प्रेक्षकांना चविष्ट अनुभव देते.

या गाण्याबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले, आमचं लक्ष्य फक्त गाणं बनवणं नव्हतं, तर मुंबईचा आत्मा टिपायचा होता. हे टायटल ट्रॅक प्रत्येकाला नाचवणार, यात अजिबात शंका नसल्याचा विश्वास ओक यांनी व्यक्त केलायं. तसेच हे गाणं लिहिताना आणि संगीत ठरवताना आमच्या डोक्यात एकच विचार होता, वडापाव जसा साधा असूनही झणझणीत आहे, तसंच हे गाणं असावं. शब्द साधे, तरीही थेट मनाला भिडणारे आणि संगीत असं की, ऐकताच पाय आपोआप थिरकायला लागतील. हे टायटल ट्रॅक म्हणजे फक्त गाणं नाही, तर मुंबईतील प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असल्याचं संगीतकार, गीतकार कुणाल – करण म्हणाले आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर! तीन पक्षांचा मतदान प्रक्रियेत भाग घेण्यास नकार

२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ‘वडापाव’ हा पूर्णपणे कौटुंबिक चित्रपट आहे. गोड नात्यांची चवदार गोष्ट यात पाहायला मिळणार असून, टायटल ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या भूमिका आहेत.

एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड, अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनरअंतर्गत हा चित्रपट निर्मित झाला आहे. निर्माते अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते तबरेझ एम. पटेल आणि सानीस खाकुरेल आहेत. छायाचित्रण दिग्दर्शक संजय मेमाणे तर लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे.

follow us