उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर! तीन पक्षांचा मतदान प्रक्रियेत भाग घेण्यास नकार

Vice Presidential Election Voting 3 Parties Refusal to participate in the voting process : देशाचा पुढचा उपराष्ट्रपती (Vice Presidential Election Voting ) कोण होणार? यासाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि निकालही जाहीर होणार आहे. मात्र आता या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये आता तीन पक्षांनी भाग घेण्यास नकार दिला आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर!
या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. कारण यामध्ये तीन पक्षांनी भाग घेण्यास नकार दिला आहे. यामध्ये बीजेडी, बीआरएस आणि अकाली दल (वारिस पंजाब दे) या पक्षांचे खासदार सरबजीत सिंह खालसा आणि अमृतपाल सिंह यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांकडे एकुण 14 खासदार आहेत. त्यांनी जर मतदान केलं नाही किंवा अनुपस्थित राहिले तर एकुण मतदारांची संख्या 781 वरून 767 पर्यंत कमी होईल. तर निवडणूक जिंकण्यासाठी 384 मत पाहिजे असतात. त्यामुळे या बहिष्काराचा परिणाम थेट रेड्डींच्या मतांवर होईल.
चार मुलं जन्माला घाला अन् करमाफी मिळवा ; ग्रीस सरकारचं अजब फर्मान, प्रकरण नेमकं काय?
या बहिष्काराचा फटका युपीएला बसू शकतो. कारण एनडीएकडे अगोदरच मजबूत मत आहेत. एनडीएकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून 425 खासदार आहेत. त्यात वायएसआरसीपीने देखील एनडीएला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 486 वर पोहचली आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळे या बहिष्काराचा परिणाम थेट रेड्डींच्या मतांवर होईल.
मराठा समाजात फूट? मराठा क्रांती मोर्चाचं कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप, मनोज जरांगे पाटलांना थेट चॅलेंज