Download App

स्त्री शक्तीचा उत्सव ठरणारा ‘लग्न अन् बरंच काही’ चित्रपट महिला दिनी प्रदर्शित!

वेदांत दाणी दिग्दर्शित लग्न अन् बरंच काही चित्रपट येत्या 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Lagn Ani Barach Kahi Movie : वेदांत दाणी दिग्दर्शित लग्न अन् बरंच काही चित्रपट येत्या 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची घोषणा करण्यात आलीयं. हा चित्रपट म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव ठरणार असून स्त्रियांनी स्त्रियांसाठी घडवलेला हा आगळावेगळा चित्रपट असणार आहे. त्यामुळे आता महिला प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता तयार झाली आहे.

India Vs Pakistan : ‘आझाद काश्मीर..,’ पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने वादग्रस्त विधान करताच भारतीय संतापले…

मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. वेदांती दाणी दिग्दर्शित, म्हाळसा एंटरटेन्मेंट आणि अव्यान आर्ट्स प्रस्तुत “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती, संगीत, अभिनय तसेच प्रसार आणि प्रसिद्धीचे सर्व टप्पे स्त्रियांच्या कुशल हातांनी पार पाडले जाणार आहेत. प्रत्येक पायरीवर महिलांचाच ठसा असलेला हा आगळावेगळा चित्रपट खर्‍या अर्थाने “महिलांनी महिलांसाठी बनवलेला चित्रपट” ठरणार आहे.

राज ठाकरे, अंबानी, शाहरुख खानकडून पैसे घ्या! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरागेंनी दिली थेट लिस्टच…

हा चित्रपट संपूर्ण महिला क्रूसह तयार होणार आहे, जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद पाऊल ठरेल. महिलांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्नं आणि संघर्ष यांना चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न तसेच लग्नानंतरचं आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचं दार उघडत नाही, तर तो तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा आरंभ ठरतो हे सर्व “लग्न आणि बरंच काही” या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

मोठी बातमी! 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार, काय दिली हवामान खात्याने माहिती?

यातील सर्वात खास क्षण म्हणजे हा चित्रपट ८ मार्च २०२६, म्हणजेच महिला दिन या विशेष दिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी करणार असून, निर्मितीचा मान संजना सुरेश पै आणि अंजली यांच्याकडे आहे. कथा लेखिका यशश्री मसुरकर हे लिहिणार आहेत , या चित्रपटाचे छायाचित्रण स्मिता निर्मळ करणार आहे. तर संगीत दिग्दर्शन वैशाली सामंत करणार आहे. एडिटिंग भक्ती मायाळू, प्रोडक्शन डिजाइन मुग्धा कुलकर्णी, ब्युटी स्टायलिंग सुप्रिया शिंदे, पी आर प्रज्ञा सुमती शेट्टी, डिजिटल मार्केटिंग अश्मीकी टिळेकर करणार असून. अभिनयाच्या माध्यमातून या चित्रपटाला जीवंत रूप देणार आहे प्रतिभावान अभिनेत्री पूजा सावंत आणि शर्मिला राजाराम शिंदे.

नगरपालिकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर! 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार प्रारूप मतदार यादी

मराठी चित्रपटसृष्टीत महिलांच्या सर्जनशीलतेचा आणि सामर्थ्याचा ठसा उमटवणारा “लग्न आणि बरंच काही” हा चित्रपट निश्चितच एक प्रेरणादायी सिनेमा ठरेल. “लग्न आणि बरंच काही” हा फक्त एक चित्रपट नसून, तो स्त्रीशक्तीचा उत्सव, गौरव आणि मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली नवी उभारी आहे.

follow us

संबंधित बातम्या