Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

Anuradha Paudwal : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी देण्यात आला आहे.

तर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांना जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करते. राज्य सरकारकडून दरवर्षी विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

संगीत व गायन क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर राज्य सरकारकडून शास्त्रीय संगीतासाठी आपले जीवन समर्पण करणारे आरती अंकलीकर-टिकेकर यांना 2024 च्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- 2024 साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे. तर श्रीमती शुभदा दादरकर यांना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2024 चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना राज्य सरकारकडून पुरस्कार देण्यात येत आहे. संजयजी महाराज पाचपोर यांना संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन 2024 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यात येणार आहे.

शशिकला झुंबर सुक्रे यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला असून 2024 साठी जनार्दन वायदंडे तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी आहे, त्यामध्ये प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाटक या विभागासाठी 2024 चा पुरस्कार श्रीमती विशाखा सुभेदार तर डॉ. विकास कशाळकर यांना उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2024 चा पुरस्कार आणि सुदेश भोसले यांना कंठसंगीत प्रकारातील 2024 चा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याच बरोबर अभिमन्यू धर्माजी सावदेकर यांना लोककला क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार जाहीर झाला आहे तर शाहिर राजेंद्र कांबळे यांना शाहीरी क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार आणि श्रीमती सोनिया परचुरे नृत्य वर्गवारीतील 2024 साठी निवड करण्यात आली असल्याची देखील सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चित्रपट क्षेत्रासाठी 2024 चा पुरस्कार श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना घोषित झाला आहे तसेच कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2024 चा पुरस्कार संजयनाना धोंडगे, वाद्यसंगीत क्षेत्रातील 2024 साठी पांडुरंग मुखडे, कलादान या प्रकारात 2024 साठी नागेश सुर्वे (ऋषीराज) यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

तमाशा वर्गवारीतील 2024 चा राज्य सांस्कृतिक पुरस्कार कैलास मारुती सावंत यांना घोषित झाला आहे तर आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2024 साठी शिवराम शंकर धुटे यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत गतवर्षीपासून दुप्पट वाढ करण्यात आली आहे. पूर्वी या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम पाच लक्ष, मानपत्र व मानचिन्ह असे होते. यावर्षी ते आता 10 लाख रुपये रोख सन्मानचिन्ह व मानपत्र असे झाले आहे. याच बरोबर यंदा राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.

यापूर्वी एक लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप होते मात्र आता तीन लाख रुपये मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बबनराव पाचपुतेंना स्व पक्षातूनच आव्हान…इच्छुकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार

याच बरोबर त्यांनी पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहणार असं देखील ते म्हणाले आणि याच बरोबर लवकरच हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे याची देखील माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version