Vicky Donor returns to theaters after 13 years Ayushmann celebrates moment with special post : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याने आपल्या पदार्पणाच्या चित्रपट विक्की डोनरच्या 13व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. जुन्या आठवणी जागवणाऱ्या काही छायाचित्रांसह त्याने चाहत्यांचे मनापासून आभार मानले आणि चित्रपटाच्या विषय व प्रभावावर चिंतन करत सांगितले की, विक्की डोनर आता पॉप कल्चरचा अविभाज्य भाग बनलेला आहे. त्याचा पोस्ट येथे पहा
MPL साठी पुनीत बालन ग्रुपचा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज; नव्या चेहऱ्यांनाही दिली संधी
शुजित सरकार दिग्दर्शित आणि जॉन अब्राहम निर्मित, हा चित्रपट अल्प बजेटमध्ये बनवला गेला असला तरीही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आणि आजही स्लीपर हिट म्हणून ओळखला जातो. त्याची धाडसी थीम, मिश्कील स्क्रिप्ट आणि आयुष्मानची मोहक अभिनयशैली यांमुळे विक्की डोनरने बॉलिवूडमध्ये सामाजिक विषयांवर आधारित नव्या कथा सांगण्याचा मार्ग खुला केला. या खास वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर त्याची जादू पुन्हा अनुभवता येणार आहे.
आयुष्मान खुराना देणार मुंबई पोलिसांना साथ!
भारतामध्ये सर्वाधिक विश्वासार्ह आणि विश्वसनीय कलाकार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता व गायक आयुष्मान खुराना आता मुंबई पोलिसांच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृती उपक्रमाचा चेहरा बनला आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे सायबर गुन्ह्यांबद्दल वाढती जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांना – विशेषतः संवेदनशील गटांना – सायबर फसवणुकीच्या क्लृप्त्यांविषयी माहिती देणे.
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ च्या मंचावर महेश मांजरेकर यांची विठुरायाला साद
या मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रचार व्हिडीओमध्ये आयुष्मान ऑनलाइन सतर्क राहण्याचे आणि सायबर फसवणुकीपासून बचावाचे काही उपयुक्त उपाय शेअर करतो. बहुतेक वेळा सामान्य नागरिकच सायबर गुन्ह्यांचे बळी ठरतात, कारण त्यांना या गुन्हेगारांच्या आधुनिक पद्धतींची पुरेशी माहिती नसते.मुंबई पोलिस आणि आयुष्मान खुराना यांचे हे संयुक्त प्रयत्न नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सशक्त बनवण्याचा संदेश देतात.