Amol Kolhe Viral Video: खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ (shivputra sambhaji ) महानाट्याचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत, अशातच त्यांचा घोड्यावरून पडल्याने काही दिवस प्रयोगांना विश्रांती दिली आहे. ही घटना घडण्याअगोदरच अमोल कोल्हे (Amol Kolhe ) यांनी कोल्हापुरात ६ एप्रिलला शिवपुत्र संभाजी नाटकाचा एक प्रयोग केला होता.
या प्रयोगाच्या अगोदरच एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओर एक चिमुकला अमोल कोल्हे यांना भेटायला येतो आणि त्याला बघता क्षणी अमोल कोल्हे त्या चिमुकल्याचे पाया पडतात. काही सेकंदामध्येच नेमकं काय घडलं, याची उत्सुकता तुम्हाला देखील लागली असेल. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना टॅग करून हा व्हिडीओ कोल्हापूरच्या प्रयोगाच्या वेळी शेअर करण्यात आला होता.
यामध्ये अमोल कोल्हे हे मंचावर उपस्थित होते, तितक्यात एक महिला आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन स्टेजवर पोहोचली. या चिमुकल्याचा केलेला पेहराव बघून अमोल कोल्हे यांनी झुकून बाळाला मुजरा केला आणि त्याच्या पाया पडले. हा क्षण बघून उपस्थिती भारावून गेले होते, नंतर अमोल कोल्हे यांनी या महिलेची चौकशी देखील केली आहे. दरम्यान, याच चाहत्यांच्या भेटीदरम्यान, अमोल कोल्हेंना भेटण्यासाठी अनेक लहान मुले आली होती.
तसेच काही कलाकारांनी त्यांचे शिवपुत्र संभाजी या रूपातील चित्र रेखाटून भेट घेत होते. दरम्यान ११ ते १६ मे दरम्यान पुन्हा एकदा नाटकाच्या प्रयोगाकरिता अमोल कोल्हे सज्ज होणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. दुखापतीनंतर त्यांनी स्वतः हॉस्पिटलमधून एक फोटो शेअर करत काळजी करण्याचे काही कारण नाही. “पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही” असे आपल्या चाहत्यांना यावेळी सांगितले आहे.
‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…
अमोल कोल्हे यांची पोस्ट
अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमोल कोल्हे हे रुग्णालयात दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी या फोटोला कॅप्शन दिलं, ‘काळजी करण्यासारखे काही नाही !!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू ” 11 मे ते 16 मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे “शिवपुत्र संभाजी” महानाट्य!’ होणार आहे.