Download App

Video : मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis On Mumbai Flim Industry : मुंबईत जगातील मोठी मनोरंजन इंडस्ट्री होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्प आणि इतर विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. बीकेसीतील जिओ कन्व्हेंशन सेंटरयेथे ही पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

भारतातून 600 टन iPhones अमेरिकेत ‘एअरलिफ्ट’; ट्रम्फच्या टॅरिफ अटॅकने पलटवला गेम

पुढे बोलताना फडणवीस म्हणाली की, केंद्रानं महाराष्ट्राला सर्वात मोठी IICT म्हणजेच इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नोलॉजी ही संस्था दिल्याबद्दल आभार मानले. ते म्हणाले की, ही संस्था देशातील सर्वात प्रायमरी क्रिएटिव्ह टेक्नोलॉजीची संस्था असणार आहे. यासाठी मुंबईतल्या फिल्मसिटीजवळ यासाठी जागा देण्यात आली असून यामध्ये केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि फिक्की वगैरे सारखे काही लोक ही संस्था या ठिकाणी उभी करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Video : मुंबईला 238 नव्या लोकल, महाराष्ट्रासाठी 1.73 लाख कोटींचे प्रकल्प; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

अशाप्रकारची ही महत्त्वाची संस्था राज्यात होणार असल्याने क्रिएटिव्ह वल्डमध्ये आपण यामाध्यमातून खूप पुढे जाणार आहोत. यासोबतच मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मलाड येथे INB मंत्रालायाची जवळपास 240 एकर जागा आहे. याठिकाणी राज्य सरकारसोबत एकत्रित येत या क्रिएटिव्ह स्पेसमधली सर्वात मोठी व्यवस्था या ठिकाणी उभी करण्याचा मानस केंद्रीय मंत्र्यांनी बोलून दाखवल्याचे फडणवीस म्हणाले. त्यामुळे क्रिएटिव्ह वल्डमध्ये आणि विशेषतः फिल्म, पोस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सर्व गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था मुंबईमध्ये तयार केली जाणार आहे. आता आपण भारताचं एन्टरटेन्मेंट कॅपिटल आहोत पण वल्ड एन्टरटेन्मेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं को-क्रिएशन हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

 

LIVE | Press Conference on Railway Projects and other key topics | Mumbai | #DevendraFadnavis

 

 

follow us