Sai Tamhankar: सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Sai Tamhankar Post: मराठी मनोरंजनसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती कायम जोरदार चर्चेत असते. (Entertainment) सईने सीरियलमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. (Social media) सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच झेप घेत असल्याचे बघायला मिळत […]

Sai Tamhankar Post

Sai Tamhankar Post

Sai Tamhankar Post: मराठी मनोरंजनसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती कायम जोरदार चर्चेत असते. (Entertainment) सईने सीरियलमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. (Social media) सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. सई सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यात उंच झेप घेत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतंच सईने मुंबईमध्ये तिचं पहिलं घर घेतलं आहे.


सई ताम्हणकरची पोस्ट
“द एलेव्हन्थ प्लेस, पुन्हा घाबरून आणि त्याच उत्साहाने मी नवीन घरात पाऊल ठेवले आहे, एक स्वप्न पूर्ण झालंय. माझं पहिलं मुंबईतील घर, एक मैलाचा दगड गाठला. एक असं ठिकाण ज्याला आपण घर म्हणतो. जिथे आठवणी विणल्या जात असतात. परंतु या आनंदाच्या दरम्यान एक कडू आठवण. माझं एकेकाळीचं जे घर होतं, त्याच्या ओळखीच्या भिंती आणि जुन्या घराचा निरोप घेतेय. ज्या ठिकाणी मी एकेकाळी आरामात राहिले होते ते सोडतेय.

त्या जुन्या घरातील प्रत्येक खोलीत आठवणी आहेत. कुजबूज, हास्याचे आणि फुललेल्या क्षणांचे प्रतिध्वनी, भिंतींवर भूतकाळातील काही कथा आहेत. परंतु एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असताना, विनम्र कृतज्ञतेने माझं मन भरून आलंय. या घरातील आठवणी आणि त्यातून अनेक धडे शिकले आहे.परंतु या नवीन घरामध्ये, नवीन स्वप्ने विणली जात आहेत. म्हणूनच मी कृतज्ञ अलिंगन देऊन या घराचा निरोप घेते आणि माझ्या नवीन घरात पाऊल ठेवत आहे, एक प्रकाशाचा किरण”, अशा आशयाची पोस्ट सई ताम्हणकरने यावेळी केली आहे.

सई ताम्हणकरने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती तिच्या जुन्या घरात सामानाचे शिफ्टींग करत असल्याचे बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना तिने मुंबईमध्ये घर खरेदी केल्याची गुडन्यूज चाहत्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

Maratha Reservation: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘या’ मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “मराठा आरक्षण…”

दरम्यान सई ताम्हणकरच्या या पोस्टवर अनेक कलाकार देखील जोरदार कमेंट करत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री क्षिती जोगने तिला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक कलाकार देखील हार्ट इमोजी शेअर करत असल्याचे दिसत आहेत.

Exit mobile version