’12th Fail’ Oscars 2024 : विक्रांत मॅसी (Vikrant Massey) स्टारर चित्रपट ’12 वी फेल’ (12th Fail) बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि रिलीजच्या 29 दिवसांनंतरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर आता 12वी फेल ने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
विक्रांत मॅसीचा ’12 वी फेल’ हा चित्रपट 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी (Oscars 2024) पाठवण्यात आला आहे. विक्रांत मॅसीचा 12 वी फेल हा या वर्षातील सर्वाधिक पसंतीचा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. ’12वी फेल’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.
विक्रांत मॅसी सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 12वी फेलच्या यशाचा आनंद घेत आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. विक्रांतने अलीकडेच शेअर केले आहे की 12 वी फेल हा चित्रपट आगामी अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच 96 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवण्यात आला आहे.
Randeep Hooda: वयाच्या 47व्या वर्षी चढणार बोहल्यावर; ‘या’ दिवशी घेणार सातफेरे
विधू विनोद चोप्राच्या 12वी फेल या चित्रपटाने जगभरात 53 कोटींची कमाई केली आहे. एकट्या भारतात या चित्रपटाने एकूण 42.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शित होऊन 4 आठवडे उलटूनही हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची क्रेझही दिसून येत आहे.
Jhimaa 2: पुन्हा चित्रपटगृह गजबजलं! हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा 2’ सिनेमा हाऊसफुल्ल
गेल्या महिन्यात अशी बातमी आली होती की विधू विनोद चोप्राचा 12वा फेल चित्रपट 2024 मध्ये ऑस्करसाठी पाठवण्याच्या तयारीत आहे. एका मुलाखतीत विक्रांत मॅसीने खुलासा केला की हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे.
विक्रांतने खुलासा केला की त्याने केवळ 15 वर्षांचा असताना अभिनय करण्यास सुरुवात केली. विक्रांतने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली आणि त्यानंतर त्याने चित्रपटांमध्ये प्रवेश केला.