मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे होणार, राज्य सरकारकडून समिती स्थापन
Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) सुखविंदर सरकारकडून मुलींच्या लग्नाचे (Marriage age) वय 21 वर्षे करण्याच्या हालचाली सुरु आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी हिमाचलचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. धनी राम शांडिल यांना याबाबत समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीकडून येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करून सरकार याबाबत कायदा करणार आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना समितीच्या स्थापनेबाबत माहिती दिली.
यापूर्वी शिमलाच्या पोर्टमोर येथील सरकारी गर्ल्स हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करण्याबाबत बोलले होते. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, राज्य सरकार मुलींच्या कल्याणासाठी काम करत आहे. सध्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ.धनीराम शांडिल यांनी समिती स्थापन केल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
“तुझी बायकापोरं ज्याने संकटात टाकली त्याला भेटायला का गेला?” : भुजबळांचा क्षीरसागरांना सवाल
हिमाचल पोलीस विभागात भरती होणार
सीएम सखू म्हणाले की, आगामी काळात पोलीस विभागात 1 हजार 200 कॉन्स्टेबल पदांवर भरती होणार आहे. यामध्ये मुलींना 30 टक्के आरक्षण दिले जाणार आहे. समाजात मुलींची प्रगती व्हावी, या उद्देशाने राज्य सरकार काम करत असल्याचे ते म्हणाले.
छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका, ओबीसी-मराठा वादाला हिंगोलीतून फोडणी?
सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावे
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, विद्यापीठात पीएचडी पदवी घेणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे. तोच समाज प्रगती करतो जिथे प्रत्येकाला सन्मानाचा अधिकार मिळतो. सुशिक्षित तरुणांनी राजकारणात पुढे यावे. विधानसभेतील 92 टक्के आमदार पदवीधर आहेत. अपयशातून यशाचा मार्ग निघतो. तरुणांनी सकारात्मक विचार करून पुढे जावे.