“परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली, भारतातच दोनाचे-चार करा” : PM मोदींचे देशवासियांना आवाहन

“परदेशात जाऊन लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली, भारतातच दोनाचे-चार करा” : PM मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन लग्न करणायेच वातावरण तयार होत आहे. हे आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतीयांसोबत, इथल्या लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी परदेशात लग्न करण्याच्या वाढत्या पद्धतीवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी आज (26 नोव्हेंबर) ‘मन की बात’ (‘Mann Ki Baat’) च्या 107 व्या भागातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. (Prime Minister Narendra Modi commented on the growing practice of foreign marriages through the ‘Mann Ki Baat’ programme.)

पंतप्रधान मोदी यांनी आज 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, आजचा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी देशातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवले होते, पण त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता पूर्ण धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत ही भारताची ताकद आहे. मुंबई हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले त्यांना मी आदरांजली अर्पण करतो. तसेच देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

Lok Sabha Election : ‘शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा देणार?’ फडणवीसांनी ठरलेलं सांगितलं

लग्न परंपरेवर मोदी काय म्हणाले?

गेल्या अनेक महिन्यांपासून मी पाहतोय ‘आजकाल काही कुटुंबांमध्ये लग्न करण्यासाठी परदेशात जात आहेत. हे आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतातील लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील. देशाची आर्थिक प्रगती होईल आणि तुमच्या खर्चाचा कुणाला तरी फायदा होईल. तुमच्या लग्नात देशवासीयांनाही काही सेवा करण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांना लग्नाशी संबंधित गोष्टी सांगू शकाल, त्याचा विचार करा, कदाचित तुमचा हा छोटासा प्रयत्न देशाच्या विकासात एक मोठा टप्पा ठरेल.

मुलंही वस्तूंवर कंट्री ऑफ ओरिजिन बघायला विसरत नाहीत :

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांमध्ये चार लाख कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाला. या काळात लोकांमध्ये खरेदी करण्यासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. यात एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे, आता घरातील लहान मुलेही दुकानात खरेदी करताना काही वस्तूच्या मागे ‘मेड इन इंडिया’ लिहिलेले आहे की नाही हे तपासू लागले आहेत. एवढेच नाही तर आता लोक वस्तू खरेदी करताना ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ तपासायला विसरत नाहीत. व्होकल फॉर लोकलची ही मोहीम संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करते.

‘एकजुटीने विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू’ :

सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपण सर्व मिळून विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू. देशाची वेळ, परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारने वेगवेगळ्या वेळी सुधारणा केल्या. पण राज्यघटनेची पहिली दुरुस्ती भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी होती हेही दुर्दैवी होते. 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात झालेल्या चुका सुधारण्यात आल्या.

26/11 Mumbai Attack : जेव्हा संपूर्ण देश हादरला होता… जाणून घ्या त्या काळ्या दिवसाची कहाणी

डिजिटल इंडिया अभियान :

डिजिटल इंडियाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘दिवाळीनिमित्त रोख पैसे देऊन वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे. आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. हे देखील खूप उत्साह वाढविणारे आहे. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नवनिर्मिती ही आज भारतीय तरुणांची ओळख आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीने त्यांच्या बुद्धिमत्तेत सतत वाढ व्हायला हवी, ही देशाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रगती आहे.

स्वच्छ भारत अभियान :

‘मन की बात’मध्ये स्वच्छ भारत अभियानाबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. आज हा उपक्रम राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनला आहे, यामुळे करोडो देशवासीयांचे जीवन सुधारले आहे. या मोहिमेने समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना, विशेषतः तरुणांना सामूहिक सहभागासाठी प्रेरित केले आहे. सुरतमधील स्वच्छतेसाठी तरुणांनी केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज