“तुझी बायकापोरं ज्याने संकटात टाकली त्याला भेटायला का गेला?” : भुजबळांचा क्षीरसागरांना सवाल

“तुझी बायकापोरं ज्याने संकटात टाकली त्याला भेटायला का गेला?” : भुजबळांचा क्षीरसागरांना सवाल

हिंगोली : रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. पण तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? असा सवाल करत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagr) यांच्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीवर हल्लाबोल केला. ते हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. (OBC leader Chhagan Bhujbal criticizes NCP (Sharad Pawar) MLAs Rohit Pawar and Sandeep Kshirsagar)

काय म्हणाले भुजबळ?

मी काही बोललो तर अनेकांना वाटते की मी दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. पण त्यांच्या 15-20 सभा झाल्यानंतर आमची एक सभा होत आहे. आम्ही काही बोललो नाही. उलट आम्हालाच फोनवरुन, मेसेजवरुन शिव्या देत आहेत. मला आलेल्या या शिव्या अत्यंत गलिच्छ भाषेत आहेत. तुमची हिंमत असेल तर वाचा, सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या असे मी पत्रकारांनाही म्हणालो. मी आणि माझे कुटुंब मागील दोन महिन्यांपासून या शिव्या वाचत आहे, ऐकत आहे. आम्ही कसे जगायचे?

“प्रकाश आंबेडकरांनी अडचणीत असताना सहकार्य करावे” : छगन भुजबळ यांचे आवाहन

पेटवायला अक्कल लागत नाही :

यावेळी भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावरही घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मी कुठे दगड मारला का? ते दगड मारत आहेत. त्यांनी घरेदारे पेटवली. मी कुठे घरे पेटवत आहे? पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते. बिघडवायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. तोडायला अक्कल लागत नाही. जोडायला अक्कल लागते अशा शब्दात भुजबळ यांनी जरांगेंवर टीका केली.

स्वतः समर्थनार्थ पुढे या :

छगन भुजबळ यांनी यावेळी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना पाठिंबा द्यायला स्वतःहुन पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “माझी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती आहे, अधिकाराच्या लढाईत निमंत्रण पाठवली जात नाही. ज्यांचा जमीर जिंदा आहे ते स्वत:समर्थनात पुढे येतात. अगर आप जिंदा हो तो जिंदा आणा भी जरुरी है. आपल्या अधिकारावर गदा येत असेल तर विरोध करायला हवा, असेही ते म्हणाले.

आंदोलन भुजबळांना नवीन नाही :

मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना भुजबळ पुढे म्हणाले, नवीन नेते म्हणतात भुजबळ म्हातारा झाला. अरे बाबा सगळेच होणार आहेत. पण आमचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. जितके केस तितकी आंदोलने छगन भुजबळने केली आहेत. आंदोलन मला नवीन नाहीत.

मराठी पाट्यांसाठी कोर्टाची मुदत संपताच ‘मनसे’ मैदानात; मुंबई-ठाण्यात दुकान, शोरुम लक्ष्य

ओबीसींना दोन्ही बाजूंनी अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे :

दोन्ही बाजूने तुम्ही आम्हाला अडचणी आणत आहेत. एकाबाजूला कुणबी दाखल्यांची मागणी सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आमचं आरक्षण चुकीचे आहे असे म्हणत बाळासाहेब सराटे यांनी उच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे. आम्हाला बाहेर काढून त्यांना आतमध्ये यायचे आहे. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देण्याचा डाव आहे, असा आरोप भुजबळ यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube