The Vaccine War : द काश्मीर फाईल्ससारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता मात्र विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठीची प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे.’द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट येत्या 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
कॅनडाचा नागरिक असलेला अक्षय कुमार कसा बनला ‘अस्सल’ भारतीय? समजून घ्या नियम
विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. त्याचबरोबर त्यांनी लिहिलंय की, रिलीज डेटची घोषणा… प्रिय मित्रांनो ‘द वॅक्सीन वॉर’सत्यकथा हा चित्रपट जगभरामध्ये 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. या चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती, त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
DATE ANNOUNCEMENT:
Dear friends, your film #TheVaccineWar #ATrueStory will release worldwide on the auspicious day of 28th September 2023.
Please bless us. pic.twitter.com/qThKxTjPiw— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) August 15, 2023
‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. राजकारणावर आधारित थरारक चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये भ्रष्ट कंपनीविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांची गोष्ट या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता नाना पाटेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी, राइमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
Tomato Price Drop : टोमॅटोच्या भाववाढीला केंद्राचा लगाम! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोने मिळणार
आज स्वातत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. हा चित्रपट कोरोना काळातील घटनेवर भाष्य करणारा आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट अर्थात आजच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र काही कारणास्तव या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट हिंदीबरोबरच, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, भोजपूरी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.