Tomato Price Drop : टोमॅटोच्या भाववाढीला केंद्राचा लगाम! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोने मिळणार

Tomato Price Drop : टोमॅटोच्या भाववाढीला केंद्राचा लगाम! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोने मिळणार

Tomato Price Drop : स्वातंत्र्यदिनी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठलायं, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा अर्थिक बसला आहे. याच पार्श्वभूमीवर टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा केंद्र सरकारने केली आहे. टोमॅटो 50 रुपये किलोने विकण्याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून सूचना जारी करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर नवीन संकट ओढावलं आहे.

PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

14 जुलैपासून राजधानी दिल्लीत टोमॅटोची विक्री स्वस्त दरात सुरु होती. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने किरकोळ बाजारात 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी विक्री केली. याचदरम्यान, देशभरातील उत्तर प्रदेश, लखनऊ, कानपूर, वाराणसी, पटना, बक्सर, प्रयागराजमध्ये टोमॅटोंची विक्री स्वस्त दरात केली जात होती.

भारत-बांग्लादेश सीमेवर भूकंप, 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेने परिसर हादरला

एनसीसीएफसह नाफेडने टोमॅटोने 90 रुपये किलोने टोमॅटो विकण्यास सुरुवात केली, 16 जुलै 2023 पासून दर 80 रुपये प्रति किलोपर्यंत कमी केले. त्यानंतर 20 जुलैपासून दर 70 रुपये करण्यात आले होते. आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो 50 रुपये किलोने विकला जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोच्या दरात भलतीच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांना चांगलाच नफा मिळत होता. आता केंद्र सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अधिकच्या नफ्याला कात्री बसणार आहे. तर देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना टोमॅटो स्वस्त दरात मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube