PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

PM Modi Speech ; पंतप्रधानांच्या भाषणात कोणता शब्द किती वेळा? भारत- 110, विश्व- 63 आणि परिवारजन- 48 वेळा उल्लेख

PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2023) देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींचे भाषण दीड तास चालले. भारत, विश्व, परिवारजन आणि संकल्प – हे शब्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सर्वाधिक वापरले.

पंतप्रधानांच्या भाषणात ‘भारत’ सर्वाधिक उल्लेख
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ‘भारत’ शब्दाचा सर्वाधिक 110 वेळा उल्लेख केला. विश्व हा शब्द 63 वेळा वापरला गेला. आज पंतप्रधानांच्या भाषणात बदल दिसून आला. अनेकदा पंतप्रधान जनतेला संबोधित करण्यासाठी ‘भाइयों-बहनों’ या शब्दांचा उल्लेख करत असतात, परंतु त्याऐवजी त्यांनी 48 वेळा परिवारजन म्हटले.

‘गाव आणि महिला’ शब्दांचाही उल्लेख
सामर्थ्य शब्द 43 वेळा वापरला गेला, तर गाव 23 वेळा वापरले गेले. याशिवाय पंतप्रधानांनी 20 वेळा संकल्प, महिला 19 वेळा, स्वातंत्र्य 17 वेळा, भ्रष्टाचार 14 वेळा आणि युवा 13 वेळा वापरला आहे.

Independence Day 2023: लालकिल्ल्यावरील सुंदर दृश्य पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलून जाईल

मणिपूरचा पाच वेळा उल्लेख केला
याशिवाय पंतप्रधानांनी आपल्या भाषणात तुष्टीकरण या शब्दाचा 10 वेळा, मध्यमवर्गाचा आठ वेळा, नेपोटिझमचा सात वेळा, जी 20 वेळा आणि सामाजिक न्यायाचा पाच वेळा उल्लेख केला आहे. पंतप्रधानांनी भाषणात पाच वेळा मणिपूर शब्दाचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी मणिपूरमधील हिंसाचाराचा तीव्र निषेध करत शांततेचे आवाहन केले.

Karan Kundra Look: स्वातंत्र्य दिनासाठी अभिनेता करण कुंद्राची अनोखी फॅशन पाहिली का?

2015 मध्ये नेहरूंचा विक्रम मोडला
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 86 मिनिटांचे भाषण करून पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मोडला होता. नेहरूंनी 1947 मध्ये लाल किल्ल्यावरून 72 मिनिटांचे भाषण केले होते. यावर्षी 2023 मध्ये नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून 90 मिनिटे भाषण केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube