भारत-बांग्लादेश सीमेवर भूकंप, 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेने परिसर हादरला

भारत-बांग्लादेश सीमेवर भूकंप, 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेने परिसर हादरला

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि बांग्लादेशच्या सीमेवर भूकंप झाल्याची घटना घडली आहे. आज (सोमवारी) रात्री 8 : 20 च्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे. या भूकंपामुळे ईशान्य भारतातील परिसराला धक्के बसले आहेत. यासंदर्भातील माहिती भूकंपविज्ञान केंद्राने ट्विटद्वारे दिली आहे.

दरम्यान, भारत-बांग्लादेश सीमवेर झालेल्या भूकंपामुळे कोणत्याही स्वरुपाची पडझड आणि पडझड झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाच्या माहितीनूसार या भूकंपाचा केंद्रबिंदू ईशान्य भारतातील आसाममधील करीमगंजपासून वायव्येस 18 किलोमीटर अंतरावर होता.

दरम्यान, मेघालयातील चेरापूंजीपासून नैऋत्य दिशेलाही ४९ किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 16 किमी खोल असल्याचंही समोर आलं आहे. या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी तातडीने घरातून बाहेर धाव घेतली आहे. यामध्ये जिवीतहानी झाल्याची कोणतीही घटना अद्याप समोर आली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube