WAR 2 Box Office Collection 300 Crore In 5 days : हृतिक रोशन, एनटीआर ज्युनियर ( Hrithik Roshan And NTR) आणि कियारा अडवाणी यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘WAR 2’ बॉक्स ऑफिसवर (WAR 2) धडाकेबाज कमाई करत आहे. अवघ्या 5 दिवसांतच या चित्रपटाने 300 कोटींचा आकडा गाठला. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणून ‘WAR 2’ने आपली छाप उमटवली (WAR 2 Box Office Collection) आहे.
नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन
सोमवार, 18 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतामध्ये एकूण 240 कोटी रुपयांची (GBOC) कमाई केली असून, यामधील नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन 196.50 कोटी रुपये इतके आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चित्रपटाने (Entertainment News) आणखी 60.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. अशाप्रकारे जागतिक पातळीवर ‘WAR 2’ची एकूण कमाई 300.50 कोटी रुपये इतकी झाली आहे.
भारतातील प्रेक्षकांकडून चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. गुरुवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने हिंदी व्हर्जनमधून 29 कोटी आणि तेलुगू व्हर्जनमधून तब्बल 25 कोटी रुपये मिळवत एकूण 54 कोटी रुपयांची कमाई (Bollywood) केली. शुक्रवारी या गल्ल्यात वाढ होऊन हिंदीतून 46 कोटी आणि तेलुगूमधून 15 कोटी अशी 61 कोटींची कमाई झाली. शनिवार-रविवारीही प्रेक्षकांची गर्दी कायम राहिली. शनिवारी 36 कोटी तर रविवारी 34 कोटींचा गल्ला जमा झाला. मात्र सोमवारी थोडी घट झाली आणि हिंदीतून 7.50 कोटी व तेलुगूमधून 2 कोटी अशी मिळून 9.50 कोटींची कमाई झाली.
टेन्शन वाढलं! 33 हजार आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर; ‘डॉक्टर नाहीत, औषधं नाहीत’ रुग्णालयांत गोंधळ
पहिल्याच विकेंडमध्ये तुफान कमाई
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ‘WAR 2’ने आपल्या अॅक्शन, थरारक स्टंट्स आणि हृतिक–एनटीआरच्या जोडीच्या करिष्म्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पहिल्या आठवड्यातच 300 कोटींचा विक्रमी टप्पा गाठल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आगामी दिवसांत ही कमाई आणखी वेगाने वाढेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे एकूण भारतातील नेट कलेक्शन (NBOC) ₹ 196.50 कोटींवर पोहोचले आहे. त्यापैकी हिंदी व्हर्जनने 137.50 कोटी तर तेलुगू व्हर्जनने 59.00 कोटींची भरघोस कमाई केली आहे.
पहिल्याच विकेंडमध्ये तुफान कमाई केल्यामुळे ‘WAR 2’ला पुढील आठवड्यातही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हृतिक आणि एनटीआरच्या अॅक्शन सीन्ससोबतच कियाराच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.