Download App

‘वॉर 2’चा अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर पहिला बॉम्ब! अवघ्या 7 तासांत $100K विक्री पार

War 2 Hits US box office : YRF स्पाय युनिव्हर्सचा वॉर 2 (War 2) ही यंदाचा सर्वात मोठा भारतीय चित्रपट आहे. जगभरात प्रेक्षकांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते आहे. या चित्रपटाच्या भोवती असलेला हायप आणि क्रेझ अधोरेखित करत, वॉर 2 ने आज सकाळी उत्तर अमेरिकन मार्केटमध्ये इतिहास रचला. ही $100,000 अ‍ॅडव्हान्स तिकीट विक्री पार करणारी सर्वात वेगवान भारतीय चित्रपट ठरली (Entertainment News) आहे. हे यश वॉर 2 ने अवघ्या सात तासांत गाठले. ज्यामुळे तिने याआधीचा विक्रमधारक एनटीआरचा देवारा चित्रपट मागे टाकला. ज्याला ही कामगिरी गाठण्यासाठी 11 तास 37 मिनिटे लागली होती.

अयान मुखर्जी दिग्दर्शित वॉर 2 मध्ये कियारा अडवाणी प्रमुख महिला भूमिकेत आहे. या वर्षातील सर्वात भव्य भारतीय चित्रपटासाठी निर्मात्यांनी “कमी दाखवा, अधिक प्रभाव” ही नीती अवलंबली आहे, जेणेकरून चित्रपटातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण प्रेक्षकांना थेट थिएटरमध्येच अनुभवता येईल. वॉर 2 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

निवडणुकीत सरकारी गाड्यातून पैसे आले; भाजपमध्ये प्रवेश करताच कैलास गोरंट्याल यांचा धक्कादायक खुलासा

‘वॉर 2’ चित्रपटाचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेला नाही, तरीसुद्धा प्रेक्षकांमध्ये याबद्दल जबरदस्त उत्सुकता आहे. ऋतिक रोशन पुन्हा एकदा ‘कबीर’च्या भूमिकेत झळकणार असून, त्याला टक्कर देताना तेलुगू सुपरस्टार एनटीआर एक सशक्त भूमिकेत दिसणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्यांची ही टक्कर, हा चित्रपट आणखीच थरारक बनवत आहे.

VIDEO : उद्धव अन् राज ठाकरेंकडून फोन; महादेव जानकरांचा धक्कादायक खुलासा, युतीचे संकेत…

YRF स्पाय युनिव्हर्समधील महत्त्वाचा भाग

‘वॉर 2’ हा YRF स्पाय युनिव्हर्समधील पाचवा चित्रपट ठरणार असून, याआधी ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’ आणि ‘पठाण’ हे चित्रपट या युनिव्हर्सचा भाग होते. यावेळी ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ फेम अयान मुखर्जीने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे, त्यामुळे एक व्हिज्युअल ट्रीट प्रेक्षकांना मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे.

 

follow us