War 2 : सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि एनटीआर (Jr. NTR) यांनी चाहत्यांना, मीडियाला आणि प्रेक्षकांना खास संदेश देत वॉर 2 (War 2) च्या कथेमधील महत्वाचे ट्विस्ट, टर्न्स आणि सरप्राइज़ सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उघड न करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सिनेमाचा रोमांच मोठ्या पडद्यावरच अनुभवता येईल.
अयान मुखर्जी दिग्दर्शित या ॲक्शन-एंटरटेनरमध्ये दोन भारतीय सैनिक आमने-सामने येतात. ऋतिक आणि एनटीआर यांनी सांगितले की हा चित्रपट ‘खूप प्रेम, वेळ आणि जिद्दीने’ बनवला असून, तो फक्त चित्रपटगृहातच पाहावा असा आहे. ऋतिक रोशन म्हणाला ,“वॉर 2 खूप प्रेम, वेळ आणि पैशनने बनवला आहे. या ड्रॅमॅटिक कथेतले ट्विस्ट आणि टर्न्स थिएटरमध्ये डोळ्यांसमोर उलगडताना पाहणे हाच खरी मजा आहे.
माझी सर्व मीडिया, प्रेक्षक, फॅन्सना विनंती आहे कृपया आमच्या स्पॉयलर्सचं रक्षण करा” एनटीआर म्हणाला ,“जेव्हा कोणी वॉर 2 पाहायला थिएटरमध्ये येईल, तेव्हा त्यांना तितकीच मजा, थ्रिल आणि मनोरंजन मिळालं पाहिजे जितकं तुम्हाला पहिल्यांदा पाहताना मिळत.
कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे; मु्ख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
स्पॉयलर्सची काही किंमत नाही आणि त्यामुळे सिनेमाचा अनुभव बिघडतो. आम्हाला भरपूर प्रेम द्या आणि वॉर 2 ची कथा सगळ्यांसाठी गुपित राहू द्या… आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो”. वाईआरएफ स्पाई यूनिवर्स मधील ही फिल्म उद्या हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.