Download App

Welcome 3 Announcement: ‘OMG 2’नंतर खिलाडीच्या आगामी सिनेमाची घोषणा; रिलीजची तारीख आउट 

Welcome 3 Film Release Date: सध्या अनेक बॉलिवूड सिनेमांची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू असल्याचे बघायला मिळाले आहे. ‘वेलकम ३’ ची घोषणा झाल्यावर अनेकदा सोशल मीडियावर (Social media) चर्चा देखील करण्यात आली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत असल्याचे चर्चा बघायला मिळत आहे. नुकताच सिनेमाबद्दल  नवीन अपडेट देण्यात आली आहे. निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.

तसेच प्रदर्शनाची तारीख देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. वेलकमला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर दुसऱ्या भागाने चाहत्यांना निराशा केल्याचे बघायला मिळाले होते. ‘वेलकम’च्या दुसऱ्या भागामध्ये जॉन अब्राहम आणि श्रृती हसनने हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. नुकतंच निर्मात्यांनी ‘वेलकम ३’ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखेची माहिती देखील देण्यात आली आहे.

येणाऱ्या २०२४ मध्ये नाताळच्या मुहूर्तावर हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. ‘वेलकम ३’मध्ये संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिका करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसापासून ‘वेलकम ३’ची चर्चा जोरदार सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात खिलाडीची भूमिका एका अनोख्या थाटात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘वेलकम ३’चे प्री-प्रॉडक्शन काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच प्रॉडक्शन टीमने देखील या सिनेमाचे शूटिंग लोकेशन देखील फायनल केल्याचे सीट आहे. तसेच या सिनेमाचे लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. सिनेमाची टीम सध्या ॲक्शन सीन आणि कॅरेक्टरच्या लूकवर काम करत असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

Mahesh Manjrekar Birthday: अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर!

या सिनेमाचे नाव ‘वेलकम ३’ किंवा ‘वेलकम टू द जंगल’ असे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘वेलकम’च्या दोन्हीही सिक्वेलचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. परंतु आता ‘वेलकम ३’चे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. आणि निर्मिती साजिद नाडियावाला करणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.

Tags

follow us