कंपनीशी माझा काहीच संबंध नाही; लुक आउट नोटीस रद्द करण्यावर काय म्हणाले कोर्ट?

कंपनीशी माझा आणि माझ्या नवऱ्याच्या अर्थात राज कुंद्राच्या काहीच संबंध नाही. माझ्या विरोधात जारी करण्यात आलेली लुक आउट नोटीस रद्द करावी.

Sgillpa

Sgillpa

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा हे चर्चेत आहे. (Shilpa) राज कुंद्रावर 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ही रक्कम न्यायालयात जमा करेपर्यंत दोघांनाही परदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास नकार दिला आहे.

कंपनीशी माझा आणि माझ्या नवऱ्याच्या अर्थात राज कुंद्राच्या काहीच संबंध नाही. माझ्या विरोधात जारी करण्यात आलेली लुक आउट नोटीस रद्द करावी अशी शिल्पाचा वकीलांनी मागणी केली. त्यावर कोर्टाने जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर आधी माफीचा साक्षीदार व्हा. राज कुंद्रा अर्थात तुमच्या पतीकडून हे प्रतिज्ञापत्रावर लिहून दाखल करा. 16 ऑक्टोबर पर्यंत, लेखी सादर करा असे निर्देश कोर्टाने दिले. EOW नं शिल्पाविरोधात लुक आउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे शिल्पाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

अनुष्का शर्मा- विराट कोहलीपासून ते सैफ अली खान आणि करीना कपूर खानपर्यंत, सेलिब्रिटी  पाडत आहेत जबाबदाऱ्या

शिल्पा शेट्टी आणि राज विरोधात लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक दिपक कोठारी यांनी गुन्हा दाखल केला होता. कोठारी यांनी तक्रारीमध्ये म्हटले होते की, सुमारे एक दशकापूर्वी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडून 60 कोटी रुपये घेतले होते. या जोडप्याने त्यांचा व्यवसाय वाढवण्याचे आश्वासन दिले होते आणि याच कामासाठी दोन हप्त्यांमध्ये 60 कोटींचे पेमेंट केले गेले होते. कोठारी यांनी आरोप केला की, पैसे घेतल्यानंतर या दोघांनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यात कोणतीही भूमिका बजावली नाही. उलट त्यांचे सर्व पैसे वैयक्तिक वापरासाठी खर्च केले.

कोठारी यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, 2015 मध्ये शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांनी एका मध्यस्थामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला आणि 75 कोटी रुपयांच्या कर्जाबाबत चर्चा केली. हे पैसे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने घेतले गेले, जी लाइफस्टाइल उत्पादनांना प्रोत्साहन देते आणि एक ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म चालवते. या कर्जासाठी 12 टक्के व्याज निश्चित करण्यात आले होते. पैसे न मिळाल्यामुळे ऑगस्ट 2025मध्ये तक्रार केली. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली.

Exit mobile version