“पाठमोरा लूक… अंगभर जखमांच्या खुणा… आणि एकच वाक्य! गश्मीर महाजनी नेमकं काय घेऊन येतोय?”

ही पोस्ट गश्मीरच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं स्पष्ट होत असून, नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Untitled Design (2)

Untitled Design (2)

What exactly is Gashmeer Mahajani bringing? : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता गश्मीर महाजनी याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक रहस्यमय पोस्ट शेअर करत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. पोस्टमध्ये गश्मीरचा पाठमोरा आणि राकट लूक पाहायला मिळत असून त्याच्या पाठीवर जखमांच्या ठळक खुणा दिसत आहेत. त्यासोबत लिहिलेलं एकच वाक्य – “माझ्या आयुष्यात आली… मोठं वादळ!” – अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

या पोस्टमध्ये चित्रपटाचं नाव, पात्र किंवा कथानकाबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, ही पोस्ट गश्मीरच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं स्पष्ट होत असून, त्याच्या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गश्मीर महाजनीने आजवर विविधांगी भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे यावेळी तो कोणत्या दमदार भूमिकेत दिसणार, याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

200 पेक्षा अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले; अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी तरुणाला अटक

पोस्टवर चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिक्रिया उमटत आहेत. “नेमकं काय येतंय?”, “हा नवा चित्रपट आहे का?”, “लूक जबरदस्त आहे!” अशा कमेंट्समधून चाहत्यांची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येते. गश्मीर महाजनीच्या या रहस्यमय पोस्टमागचं गूढ नेमकं काय आहे, याचा उलगडा लवकरच होणार आहे. तोपर्यंत या आगामी चित्रपटाबाबतच्या प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहणार, हे मात्र निश्चित.

Exit mobile version