Download App

17 वर्षांनंतरही ‘जाने तू… या जाने ना’ चित्रपट सर्वांना का आवडतो? जाणून घ्या खास कारणं

Movie Jaane Tu Ya Jaane Na : भारतीय सिनेमाच्या विश्वात आमिर खान प्रोडक्शन्स हे एक विश्वासार्ह आणि दर्जेदार बॅनर मानलं (Jaane Tu Ya Jaane Na) जातं, ज्याने नेहमीच सर्व प्रकारच्या शैलींमध्ये दमदार चित्रपट (Bollywood Movie) दिले आहेत – मग तो ड्रामा असो, कॉमेडी, की थ्रिलर. अशाच खास चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जाने तू… या जाने ना’, जो आजपासून नेमकं 17 वर्षांपूर्वी प्रदर्शित (Entertainment News) झाला होता.

तरुणाईच्या भावना – सच्च्या आणि ताज्या पद्धतीने

इम्रान खान आणि जेनेलिया डिसूझा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या रोमँटिक कॉमेडी-ड्रामाचं दिग्दर्शन अब्बास टायरवाला यांनी केलं होतं. या चित्रपटाने प्रेम, मैत्री आणि तरुणाईच्या भावना अगदी ताज्या, हलक्याफुलक्या आणि सच्च्या पद्धतीने मांडल्या. या सादगीमुळे आणि भावनिक स्पर्शामुळे ‘जाने तू… या जाने ना’ ही केवळ एक यशस्वी फिल्म ठरली नाही, तर लाखो हृदयांमध्ये कायमचं घर करून गेली.

गाणी – चित्रपटाची खरी शान

या चित्रपटाचं संगीत ही त्याची सर्वात मोठी ताकद होती. ए.आर. रहमान यांच्या जादूई संगीतातून “कहीं तो”, “कभी कभी अदिति” आणि “पप्पू कांट डान्स साला” सारखी गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. या गाण्यांमधील भावना, मस्ती आणि कोमलता प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना अजूनही भावतात. रहमान यांचं संगीत आणि अब्बास टायरवाला यांची स्टोरीटेलिंग यांचं हे अनोखं मिश्रण आजही नवीन अनुभव देतं.

ड्रामा, कॉमेडी आणि रोमँस यांचा परिपूर्ण मेळ

या चित्रपटाने प्रेमकथा आणि मैत्रीचं अनोखं मिश्रण दिलं. कॉलेज ग्रुप, मजेदार संवाद, हलकेफुलके क्षण आणि भावनिक गुंतवणूक यामुळे हा चित्रपट एक ‘परफेक्ट पॅकेज’ ठरला. प्रेम आणि मैत्री यांच्यातील नाजूक सीमारेषा, तरुण मनाचे गुंते आणि आत्मशोध या सगळ्याच गोष्टी इतक्या सहज मांडण्यात आल्या की प्रेक्षकांना ही आपलीच गोष्ट वाटते.

आठवणींचं संचित – तरुणपणाचं प्रतिबिंब

जय (इम्रान खान) आणि अदिती (जेनेलिया डिसूझा) यांची गोष्ट ही फक्त एक प्रेमकथा नसून, ती आठवणींचा खजिना आहे. कॉलेजचे दिवस, मैत्रीचे क्षण, प्रेमातलं गोंधळ आणि स्वतःला ओळखण्याचा प्रवास – ही एक अशी स्लाइस-ऑफ-लाइफ गोष्ट आहे, जी प्रत्येक तरुणाच्या हृदयाशी नातं जोडते.

प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी केमिस्ट्री

इम्रान खान आणि जेनेलिया डिसूझा यांची केमिस्ट्री ही या चित्रपटाची खरी जादू होती. दोघांचं सहज अभिनय, निखळ भावनांमधून मैत्रीचं आणि प्रेमाचं सादरीकरण – यांनी चित्रपटाला खरी जिवंतता दिली. त्यांच्या सादरीकरणामुळे अनेक तरुणांना आपला कॉलेज काळ आठवला.

आजही हृदयात घर करून बसलेली

‘जाने तू… या जाने ना’ ही फक्त एक फिल्म नाही, ती एक भावना आहे. ती पाहताना आजही असं वाटतं की कोणी आपल्याला आपुलकीने मिठी मारली आहे. तिच्या सादगीत, हसण्यात, अश्रूंमध्ये आणि प्रेमात एक नितळपणा आहे, जो काळ कितीही बदलला तरी मनात तसाच राहतो. यामुळेच आज 17 वर्षांनंतरही हा चित्रपट तितकाच फ्रेश वाटतो, जितका तो २००८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. ही एक टाइमलेस क्लासिक आहे – प्रत्येक वयोगटासाठी एक ‘मस्ट-वॉच’!

 

follow us