Manmauji Movie: ….आणि सायली– भूषणची जोडी जमली ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र
Manmauji Poster Release: तारुण्य हे प्रेमाचं, आकर्षणाचं असतं. म्हणूनच प्रत्येक तरुणाला कोणती ना कोणती मुलगी आवडतेच… पण मुलगी किंवा बायका न आवडणारा एखादा तरुण असेल तर? (Marathi Movie) अशाच एका तरुणाची गोष्ट उलगडणाऱ्या ‘मनमौजी’ (Manmauji Movie ) या चित्रपटाचे अनोखे मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. अतिशय फ्रेश लुक असलेला, तगडी स्टारकास्ट असलेला “मनमौजी” हा चित्रपट 8 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
गुलाबजाम, लॉस्ट अँड फाऊंड अशा चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्सच्या विनोद मलगेवार यांनी “मनमौजी” चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शीतल शेट्टी यांचे असून हृषिकेश जोशी यांनी संवाद लेखन केले आहे. प्रसाद भेंडे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. क्षितिज पटवर्धन आणि वलय मुळगुंद यांनी गीतलेखन, अमितराज आणि पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात अभिनेता भूषण पाटील अभिनेत्री सायली संजीव, सिनेसृष्टीत प्रथमच पदार्पण करणारी रिया नलावडे, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फिल्मास्त्र स्टुडिओज ह्या चित्रपटाचे वितरक म्हणून काम पाहणार आहेत तर कार्यकारी निर्माता म्हणून संदीप काळे यांनी काम पाहिले आहे.
“मनमौजी” म्हटल्यावर आपल्याला हवं तसं वागणं असं म्हणता येतं. पण चित्रपटाचा फर्स्ट लुक फार रंजक आहे. मोकळ्या वातावरणात धावत असलेल्या तरुणाबरोबर आजुबाजूच्या तरुणीही धावू लागतात आणि त्याच्या जवळ येतात. पण मनमौजी चित्रपटात तर मुली किंवा बायका न आवडणारा तरुण नायक आहे. त्यामुळे सतत जवळ येणाऱ्या बायकांमुळे त्याचं काय होत असेल याची रंजक गोष्ट या चित्रपटात उलगडणार आहे. सिक्स पॅक अॅब्ज आणि फ्रेश लुक असलेला भूषण पाटील या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मनमौजी चित्रपटासाठी आता 8 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहायलाच हवी.
Panchak Marathi Movie: बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ
सुव्रत आणि सायली सांगतात, ‘आम्ही ‘मन फकीरा’ सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. आम्हांला भूषण आणि रिया ही भूमिका साकारताना खूप मज्जा आली. एकमेकांबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय असा अनुभव होता. आमची या चित्रपटासाठी निवड केली याबद्दल दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे हिचे आम्ही खूप खूप आभार मानतो. तिने या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन खूप उत्तमरीत्या केले आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडेल असा आम्हांला विश्वास आहे.’