Download App

Yaariyan 2 सिनेमा वादाच्या भवऱ्यात; निर्मात्यांसह कलाकारांविरोधात तक्रार दाखल

  • Written By: Last Updated:

Yaariyan 2 In Trouble: ‘यारियां २’ (Yaariyan 2) सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु हा सिनेमा आता चांगलाच वादाच्या भवऱ्यात अडकला आहे. धार्मिक भावना दुखावल्याने या सिनेमाविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक राधिका राव बाबी विनय सप्रू, अभिनेता मीझान जाफरी यांच्या आगामी सिनेमातील गाण्यात ‘किरपान’ वापरले असल्याचे दाखविल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने,(Shiromani Gurdwara) अमृतसर पोलिसांनी (Police) ई डिव्हिजन पीएस इथे कलाम इंडियन पिनल कोर्ट २९५ – अ धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीमध्ये, शिखांच्या भावना दुखावल्याने सिनेमा निर्मात्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर आता ‘यारियां २’ या सिनेमाच्या दिग्दर्शकांनी एक निवेदन जारी केले आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी एक ट्वीट करत सांगितले आहे की,” गाण्यात अभिनेत्याने किरपाण नाही तर खुकरी घातली आहे. ते खुकरी आहे, हे सिनेमातील संवाद देखील हे स्पष्ट करतात. तरी देखील गैरसमज झाला असेल तर आम्ही याबद्दल दिलगीर व्यक्त करत आहोत. कोणत्याही धार्मिक श्रद्धा दुखावण्याचा किंवा अनादर करण्याचा आमचा आजिबात हेतू नव्हता.

R. Madhavan : FTII ला मिळाला नवीन अध्यक्ष, अभिनेता आर माधवन यांची नियुक्ती; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

२०१४ साली गाजलेला यारियां या सिनेमात हिमांश कोहली, रकुल प्रित सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. यारियां २ मध्ये एक पूर्णपणे फ्रेश जोडी बघायला मिळत आहे. यारिया हा सिनेमा मैत्री, प्रेम या नात्यावर आधारित आहे. यामुळे यारिया २ मध्ये काय नवीन बघायला मिळणार यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us