Yash Chopra Foundation announces ‘Saathi 2026’ : यश चोपड़ा फाउंडेशन, ही यश राज फिल्म्सची सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था, साथी प्रोग्राम 2026 च्या शुभारंभाची घोषणा करत आहे. हा वर्षभर चालणारा कल्याणकारी उपक्रम असून, चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सातत्यपूर्ण व संरचित सहाय्य देण्याचा उद्देश यामागे आहे. एकदाच दिल्या जाणाऱ्या मदतीपलीकडे जाऊन, मूलभूत गरजा पूर्ण करणे आणि जीवनमान उंचावणे हा या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे.
2026 मध्ये हा कार्यक्रम नोंदणीकृत चित्रपटसृष्टीतील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना सहाय्य देईल. यामध्ये अन्नसुरक्षा बळकट करण्यासाठी मासिक घरगुती मदत, औषधे व वैद्यकीय तपासण्या यांसह आरोग्यसेवा सहाय्य, मुलांच्या शिक्षण व शालेय गरजांसाठी मदत, तसेच वार्षिक मूळगावी जाण्यासाठी आवश्यक प्रवास सहाय्य यांचा समावेश आहे. 60 वर्षे व त्यापुढील वयाचे निवृत्त चित्रपट कामगार आणि दिव्यांग व्यक्तींवर विशेष भर देण्यात आला आहे, कारण त्यांच्या आरोग्यविषयक गरजा अधिक असून उत्पन्नाची साधने मर्यादित असतात.
अवकाळीचं संकट कायम,’या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अलर्ट जारी
साथी प्रोग्राम साठी पात्रतेमध्ये मान्यताप्राप्त संघटनांमध्ये नोंदणीकृत सक्रिय चित्रपट कामगार, कमी उत्पन्न असलेली कुटुंबे, शाळा किंवा महाविद्यालयात शिक्षण घेणारी मुले असलेली कुटुंबे, तसेच सातत्याने वैद्यकीय उपचारांची गरज असलेले ज्येष्ठ कामगार यांचा समावेश आहे. साथी प्रोग्राम 2026 अंतर्गत वर्षभराच्या सहाय्याला अधिक बळकटी देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यासाठी वार्षिक सहाय्य रकमेतील वाढ, वैयक्तिक गरजांनुसार मदत देण्यासाठी लवचिक लाभ संरचना, तपासणी व उपचारांसाठी आरोग्यसेवांना अधिक प्राधान्य, तसेच लाभ सहज मिळावेत यासाठी सुलभ डिजिटल वितरण प्रणाली यांचा समावेश आहे.
साथी प्रोग्राम 2026 च्या माध्यमातून यश चोप्रा फाउंडेशन भारतीय सिनेमाच्या पडद्यामागील कणा असलेल्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे, आणि त्यांना सन्मानपूर्वक व सातत्यपूर्ण सहाय्य देत आहे. साथी प्रोग्राम 2026 विषयी अधिक माहितीसाठी yashrajfilms.com/ycf या संकेतस्थळाला भेट द्या.
