‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता अमर जाधव छोट्या पडद्यावर! ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Yed Lagal Premachan अत्यंत संघर्षातून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अमर जाधव हे एक आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीतून ते पुढे आले.

Yed Lagal Premachan

Yed Lagal Premachan

‘Yed Lagal Premachan’ fame actor Amar Jadhav on small screen play an important role in Aanadi Serial : अमर जाधव यांना याआधी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतील कावेबाज-खलनायकी ‘गौरव सारडा’ आणि ‘आप्पी आमची कलेक्टर’मधील साधा-भोळा ‘अनिल सर’ या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘येड लागलं प्रेमाचं’मधील ‘प्रशांत दाजी’ या भूमिकेवर प्रेक्षकांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. याशिवाय ‘धर्मवीर २’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली असून, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘राकेश मारिया’ या आगामी हिंदी चित्रपटातही ते झळकणार आहेत.

‘राजा शिवाजी’ ची ऐतिहासिक घोडदौड कायम! रेकॉर्डब्रेक ओपनिंगनंतर दुसऱ्या दिवशीही दमदार कमाई

‘आनंदी’ मालिकेतील ‘अभय’ या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमर जाधव म्हणाले, “सोल प्रोडक्शन आणि स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करताना मला खूप आनंद आणि उत्साह वाटतो आहे. ‘अभय’ ही भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल. अभय हा अत्यंत आज्ञाधारक, गुणी आणि कुटुंबवत्सल मुलगा आहे. तो ‘Work is Worship’ या तत्वावर विश्वास ठेवतो. मात्र, त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्यामुळे कथेला वेगळी वळणं मिळतात.”ज्या बघायला प्रेक्षकांना नक्की मजा येईल.’

‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’

अत्यंत संघर्षातून स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या अभिनेत्यांपैकी अमर जाधव हे एक आहेत. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील साध्या कुटुंबातून ते पुढे आले. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शेतीचा आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या प्रतिभावान अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Exit mobile version