‘नान उंगल वेत्तू पिल्लैयागा इंगे निकिरेन’ याच शब्दांनी विजय तामिळनाडूतील निवडणुकांमध्ये बनला ‘थलपती’
Tamilnadu Election रुपेरी पडद्यावर 'थलपथी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयच्या राजकीय विजयाने द्रविड बालेकिल्ला हादरवून गेला आहे.
Tamilnadu Election Result Update : 4 मे 2026 रोजी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना, सर्वत्र फक्त एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे विजय उर्फ थलपती. रुपेरी पडद्यावर ‘थलपथी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयच्या राजकीय विजयाने अनेक दशकांपासून चालत आलेल्या द्रविड बालेकिल्ला हादरवून गेला आहे. आता प्रश्न असा आहे की, विजयने असे काय केले आहे की, जनतेने बॉक्स ऑफिसच्या अभिनेत्याला राजकारणाच्या आखाड्यातही नंबर एक बनवले.
तामिळनाडूत ‘थलपती’ नावाचा ‘ब्लॉकबस्टर’; क्लायमॅक्समुळे राजकीय चाणक्यही गारद
1. ‘तिरुक्कुरळ’मधील ती एकच ओळ
विजयच्या राजकीय विचारधारेची सर्वात मोठी ताकद बनली ती 27 ऑक्टोबर, 2024 रोजी विक्रवंडी (विल्लुपुरम) येथील पहिली भव्य सभाय सभेच्या ठिकाणी असलेल्या मंचाच्या मागे एक भव्य पोस्टर लावण्यात आले होते. त्या पोस्टरवर महान संत-कवी तिरुवल्लुवर यांचे चित्र होते आणि सर्वात वर एक ओळ होती. “पिराप्पुक्कुम एल्ला उयिरक्कुम,” ज्याचा अर्थ आहे की, “सर्व माणसे समान जन्माला येतात.” ही ओळ विजयचा सर्वात मोठा विजय ठरली, ज्यामुळे तो जातीयवादाच्या पलीकडे गेला आणि गरीब, दलित किंवा श्रीमंत अशा समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले.
ही ओळ तमिळ पवित्र ग्रंथ, तिरुक्कुरळच्या अध्याय 98 मधून घेतली आहे. विजयने याला आपल्या ‘तमिझगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाचे अधिकृत घोषवाक्य बनवले. या ओळीद्वारे, त्याने कोणत्याही एका जातीच्या मर्यादा ओलांडून स्वतःला ‘सर्वांचा नेता’ म्हणून प्रस्थापित केले. तिरुवल्लुवर यांचा उल्लेख करून, त्याने तमिळ विचारवंत आणि ज्येष्ठांची मने जिंकली, जे पूर्वी त्याला केवळ एक ‘चित्रपट अभिनेता’ मानत होते.
2. “मी सुपरस्टार नाही, मी तुमचा घरचा मुलगा “
विजयने आपल्या सभांमध्ये स्वतःला कधीही एक मोठा नेता म्हणून सादर केले नाही. 7 मार्च 2026 रोजी तिरुची येथील सभेत विजयने जे वक्तव्य केले, त्यामुळे तो महिला आणि मातांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. “विरोधक मला ‘अभिनेता’ म्हणू शकतात, पण जेव्हा मी या गर्दीकडे पाहतो, तेव्हा मला कोणतेही पद दिसत नाही. इथे उभ्या असलेल्या प्रत्येक आईच्या डोळ्यांत मला आपलेपणाची भावना दिसते. ” Naan ungal veettu pillaiyaga inge nirkiren,असे तो म्हणाला, ज्याचा अर्थ असा होतो की, “मी इथे तुमच्या कुटुंबाचा मुलगा म्हणून उभा आहे.” जो मुलगा आतापर्यंत पडद्यावर, तुमच्या टाळ्यांचा कडकडाट अनुभवत मोठा झाला, तो आज तुमचे अश्रू आणि तुमच्या समस्या पुसण्यासाठी तुमच्यासमोर आला आहे. जेव्हा एखादा मुलगा आपला उदरनिर्वाह करतो, तेव्हा तो सर्वप्रथम आपल्या आई आणि बहिणींची काळजी घेतो. राजकारणात येण्यामागे माझाही हाच उद्देश आहे. मला सत्तेची लालसा नाही; तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, तो मला केवळ सार्थ करायचा आहे. Tamilnadu Election Result Update
Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
3. तरुण आणि महिलांसोबत सरळ, साधे संवाद
मार्च 2026 मध्ये थलपतीने मदुराईमध्ये एक रॅली घेतली. यात त्याने तरुणांना सांगितले की, तुम्ही मला ‘थलापती’ म्हणता. पण लक्षात ठेवा, तुमच्यासारखे दक्ष सैनिक असतील तरच सेनापती जिंकतो. मला तुम्हाला रोजगाराचा हक्क द्यायचा आहे, दारूचे टोकन नाही. तामिळनाडूतील प्रत्येक तरुणाने “माझे सरकार माझे खिसे भरत नाही, ते मला कमावण्याची संधी देते.” असे म्हणावे अशी माझी इच्छा आहे.
4. विजयची खास शैली
विजय अनेकदा त्याच्या सभांमध्ये रूपकांचा वापर करायचा, जे व्हायरल व्हायचे. राजकारण सापासारखं आहे. जर तुम्ही त्याला ओळखत नसाल, तर तो तुम्हाला चावेल. पण जर तुम्हाला एखाद्या लहान मुलाप्रमाणे निर्भयपणे त्याला हाताळता आले, तर तुम्ही त्याला नियंत्रणात ठेवू शकता. तुमच्या चिंता दूर करण्यासाठी मी तेच लहान मूल आहे, जे या सापासमोर उभे आहे.
आसाम, केरळम, तामिळनाडू पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालचा एक्झिट पोल काय?
5. विचारधारा आणि विरोधकांना लक्ष्य करणे
कोणाचेही नाव न घेता, विजयने सत्ताधारी पक्ष (डीएमके) आणि केंद्रीय राजकारणावर निशाणा साधला होता. एका बाजूला ‘फॅसिझम’बद्दल बोलणारे, पण स्वतःच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले लोक आहेत. दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावावर फूट पाडणारे लोक आहेत. आमची विचारधारा अगदी स्पष्ट आहे. ‘पिराप्पुक्कुम एल्ला उयिरक्कुम’ (जन्माने सर्वजण समान आहेत). आम्ही पेरियारांचा स्वाभिमान आणि आंबेडकरांचा न्याय स्वीकारू, पण आम्ही नास्तिकतेचे राजकारण करणार नाही; आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धांचा आदर करू.
6. एकट्याने लढण्याचा धाडसी निर्णय
प्रमुख राजकीय पक्ष युतीशिवाय निवडणुका लढवण्यास घाबरत असताना, विजयने सर्व 234 जागा एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला. 13 सप्टेंबर, 2025 रोजी सुरू झालेल्या त्याच्या “राज्यव्यापी यात्रेला” लाखो लोकांची गर्दी जमली. त्याच्या पहिल्याच सभेला 8 लाखांहून अधिक लोक जमले होते, ज्यामुळे प्रस्थापित पक्षांची झोप उडाली.