Download App

YRKKH Twist: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अखेर अभिरा अन् अरमानच्या लग्नात नेमकं काय घडणार?

YRKKH Twist : काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री समृद्धी शुक्ला (Samriddhi Shukla ) आणि शहजादा धामी (Shehzada Dhami) यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ही मालिका आता घराघरात पोहोचली आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता या मालिकेतील निर्मात्यांनी शोचा एक नवीन प्रोमो सादर केला आहे.


या प्रोमोमध्ये एक ट्विस्ट दाखवण्यात आला आहे, अभिराच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे बघायला मिळत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या प्रेक्षकांनी विविध भावना आणि कथानकाचे रोमांचक ट्विस्ट अनुभवले आहेत. अक्षरा आणि अभिमन्यूची जोडी ही हे शोचे मुख्य आकर्षण असल्याचे बघायला मिळणार आहे. पाच वर्षांच्या लीपनंतर कथानक नव्या वळणावर असून यामध्ये जय सोनी अभिनवच्या भूमिकेत आहे, जिथे तो अक्षराच्या पतीची भूमिका साकारणार आहे.

याविषयी बोलताना अभिनेत्री समृद्धी शुक्ला उर्फ ​​अभिरा सांगितले की, “आई अक्षराच्या निधनामुळे अभिराचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. अक्षरा ही एक अभिराच्या संसार महत्वाचा भाग होता, आणि आता तिच्या मृत्यूनंतर अभिराचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे बघायला मिळणार आहे. अभिरा आणि अरमानचं लग्न केवळ पूर्ण करण्यासाठी म्हणून झालं नाही, तर अक्षराची शेवटची इच्छा होती.कारण ते तिच्यावर प्रेम करत आणि तिचा नेहमी आदर करत होते.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या आजपासून सुरू होणाऱ्या नव्या पर्वात, समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी हे कलावंत मुख्य भूमिका साकारत मालिकेचा समृद्ध वारसा पुढे नेणार आहेत. समृद्धी शुक्ला (अभिरा), शहजादा धामी (अरमान), प्रतीक्षा होनमुखे (रूही) आणि शिवम खजुरिया (रोहित) यांचा परिचय करून देणार्‍या या मालिकेची एक झलक प्रेक्षकांना अलीकडेच पाहायला मिळाली. या ‘प्रोमो’त मालिकेच्या कथानकाने एक अनपेक्षित वळण घेतल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यात एका क्लेशकारक घटनेमुळे अभिरा आणि अरमान लग्नाची गाठ बांधतात खरे, पण तरीही अरमान मात्र आजही रुहीच्या प्रेमात आहे, जिचे अरमानच्या भावाशी- रोहितशी लग्न होते. मालिकेच्या नव्या अध्यायात अभिरा, अरमान, रूही आणि रोहित यांच्या आयुष्यात उलगडत जाणारे रंजक नाट्य प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल.

Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सनी लिओनीने ‘थर्ड पार्टी’ गाण्याचं केलं प्रमोशन !

या सर्व प्रकाराचा अभिराला मोठा धक्का बसतो. अभिराला तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत आणि आता ती या परिस्थितीला कशी सामोरे जाते आणि ती कशी जुळवून घेते हे पाहणे रंजक असणार आहे. चाहते आपली आवडती जोडी अभिमन्यु आणि अक्षरा एकत्र येण्याची वाट पहात असून त्यांच्यातील रोमांस पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ स्टार प्लसवर सोमवार ते रविवार दर रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होतो.

Tags

follow us