Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सनी लिओनीने ‘थर्ड पार्टी’ गाण्याचं केलं प्रमोशन !

Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सनी लिओनीने ‘थर्ड पार्टी’ गाण्याचं केलं प्रमोशन !

Sunny Leone Bigg Boss 17:  ‘बिग बॉस 17’ सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. या दोन आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. (Bigg Boss 17) आज पहिला ‘वीकेंड का वार’ पार पडणार आहे. सलमान खानला पाहण्यासाठी आणि तो कोणाची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच सनी लिओनीने (Sunny Leone) ‘वीकेंड का वार’ मध्ये (Weekend Ka Vaar) ‘थर्ड पार्टी’ (Third Party Song) या तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


सनी लिओनी बिग बॉस 17 मध्ये तिच्या ‘नवीन सिंगल थर्ड पार्टी’ या गाण्याच्या प्रमोशनसाठी परत आली आहे. तिच्यासोबत अभिषेक सिंग देखील सामील होणार आहे. सध्या बिग बॉस 17 होस्ट करत असलेला चाहत्यांचा लाडका सलमान खान या गाण्याच्या प्रमोशनवेळेस खास डान्स करणार का? अशी शक्यता चाहते वर्तवत आहेत. पहिल्या बिग बॉस OTT 2 एपिसोडमध्ये सनी लिओनीने अनोख्या अनोख्या अंदाजात एन्ट्री केली होती. बिग बॉस 17 मधील हा तिचा महत्वाचा टप्पा असणार आहे.

‘बिग बॉस’ च्या या आठवड्यात ‘उडारिया’ फेम अभिनेता अभिषेक कुमारचे अग्रेसिव्ह रूप पाहायला मिळाले. त्याने बिग बॉसच्या घरामध्ये यायच्या अगोदरच भांडण करायला सुरुवात केली होती. त्याची कोस्टार ईशासोबत त्याने पहिल्या दिवशी स्टेजवर भांडण केले होते. त्यानंतर त्याने घरामध्ये सोनिया बंसल, खानजादी, सनी आर्य आणि अरूण माशेट्टी यांच्याशी भांडण केले आहे. अरुण आणि त्याचे भांडण इतके टोकले केले की ते एकमेकांना बोलत देखील नसतात.

Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!

सध्या सोशल मीडियावर ‘वीकेंड का वार’च्या अपडेट यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या वीकेंडला ‘बिग बॉस’च्या घरात जोरदार राडा बघायला मिळणार आहे. ‘बिग बॉस तक’ या एक्स अकाउंटने अपडेट शेअर करत सांगितले आहे की, या वीकेंडला सलमान खान अभिषेक कुमारची शाळा घेणार का? तसेच ईशाला देखील डबल स्टॅन्ड घेतल्यामुळे तिला सुनावले जाणार आहे.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सनी लिओनी यांचा तामिळ चित्रपट कोटेशन गँगही रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कोटेशन गँग’ चे दिग्दर्शन विवेक कुमार कन्नन यांनी केले आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळमध्येही रिलीज होणार आहे. सनीचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube