Alpha Behind The Scenes Video : यशराज फिल्म्सने ‘ऐल्फा’चा एक हाय-ऑक्टेन बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ रिलीज केला आहे, जो प्रेक्षकांना वायआरएफ स्पाय युनिव्हर्समधील पहिल्या महिला-प्रधान चित्रपटाच्या निर्मितीची आणि त्यातील थरारक अॅक्शनची खास झलक दाखवतो. या मेकिंग व्हिडिओमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी (Sharvari) चित्रपटातील काही अत्यंत आव्हानात्मक अॅक्शन सीक्वेन्स स्वतः करताना दिसत आहेत. त्यांच्या पात्रांना पडद्यावर जिवंत करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि समर्पण यातून स्पष्टपणे दिसून येते.
चित्रपटाचे दिग्दर्शक शिव रवैल यांनी सांगितले की, या कठीण अॅक्शन सीक्वेन्ससाठी दोन्ही अभिनेत्रीांनी विस्तृत आणि कठोर प्रशिक्षण घेतले होते. आलियाच्या (Alia Bhatt) समर्पणाबद्दल बोलताना शिव म्हणाला, “फक्त या एका सीक्वेन्ससाठीच आलियाने खूप प्रशिक्षण घेतले आहे. प्रेक्षकांना एक वेगळी आणि नवी आलिया भट्ट पाहायला मिळेल अशी मला आशा आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट आणि त्यातील अॅक्शन सीक्वेन्स पाहाल, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व त्यांनी स्वतः केले आहे. इतक्या वेगवान आणि धोकादायक अॅक्शनमध्येही त्या स्वतः शस्त्रांसह परफॉर्म करताना दिसतील.”
हा मेकिंग व्हिडिओ चित्रपटातील अॅक्शनची भव्यता आणि गुंतागुंतही दाखवतो. अॅक्शन डायरेक्टर क्रेग मॅक्रे म्हणाले,“वायर्सवरील रोटेशन्स, स्फोट, गनफाईट्स, नाइफ फाईट्स प्रेक्षकांसाठी हा एक रोमांचक आणि अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.” हाय-इंटेन्सिटी कॉम्बॅट सीक्वेन्सपासून ते मोठ्या प्रमाणावर साकारण्यात आलेल्या स्टंट्सपर्यंत, आलिया आणि शर्वरी यांनी स्वतःला पूर्णपणे अॅक्शनमध्ये झोकून दिले आहे. त्यांनी प्रत्येक दृश्य अत्यंत अचूकता, समर्पण आणि आत्मविश्वासाने साकारले आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि ‘द रेल्वे मेन’ फेम दिग्दर्शक शिव रवैल दिग्दर्शित ‘ऐल्फा ’ हा चित्रपट 3 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक येथे क्लिक करा :
