Download App

युजवेंद्रकडूनही सस्पेन्स, घटस्फोटांच्या चर्चांवर म्हणाला, “माझ्या परिवाराला..”

मी सगळ्यांनाच विनंती करतो की अशा तर्कवितर्कांत पडू नका. कारण यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अतोनात दुःख होत आहे.

Yuzvendra Chahal Breaks Silence : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या (Dhanashree Verma) वैयक्तिक आयुष्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेतील अशाही चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळकटी देणारे प्रसंगही घडले आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलंय. इतकचं नाही तर चहलने (Yuzvendra Chahal) धनश्री बरोबरील त्याचे फोटोही इन्स्टाग्रामवरुन डिलिट केले आहेत. परंतु, घटस्फोटाच्या चर्चांवर मात्र दोघांनीही मौन धारण केलं होतं. पण, चर्चा वाढल्या आणि धनश्रीला चांगलंच ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यामुळे तिने एक पोस्ट शेअर केली होती. यानंतर आता युजवेंद्रनेही एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने घटस्फोटाबाबच थेट वक्तव्य टाळलं आहे. पण त्याने असं काही लिहिलं आहे ज्यामुळे त्याची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जे दावे केले जात आहेत ते खरे आहेत किंवा नाही. त्याच्या या वक्तव्याचीही आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोटाच्या चर्चेनंतर सूचक पोस्ट, चक्क हात जोडून केलं मन मोकळं

युजवेंद्रने नेमकं काय सांगितलं

सर्व चाहत्यांकडून मला जे प्रेम मिळालं पाठिंबा मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलोय. पण हा प्रवास इथेच थांबलेला नाही. कारण माझा देश, माझी टीम आणि माझ्या चाहत्यांसाठी आणखीही काही ओव्हर बाकी आहेत. एक खेळाडू म्हणून मला कायमच अभिमान राहिल. मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र सुद्धा आहे.

माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांच्या मनात जी जिज्ञासा निर्माण झाली आहे त्याची मला जाणीव आहे. सोशल मीडियावर आज ज्या चर्चा सुरू आहेत. जे तर्क लावले जात आहेत ते खरेही असू शकतात किंवा खोटेही असू शकतात. मी सगळ्यांनाच विनंती करतो की अशा तर्कवितर्कांत पडू नका. कारण यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला अतोनात दुःख होत आहे. माझ्या कुटुंबियांना मला नेहमीच कष्ट करायला सर्वांचं चांगलं व्हावं अशी मनोकामना करण्यास शिकवलं आहे. मी नेहमीच तुमचं प्रेम आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत राहीन.

Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चा, धनश्रीने ट्रोलर्सना फटकारलं, म्हणाली, “माझं मौन हे..”

धनश्री वर्मा काय म्हणाली होती?

याआधी धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली होती. गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. निराधार लिखाण, कोणत्याही गोष्टीचं सत्य जाणून न घेणं आणि बिना चेहऱ्याच्या ट्रोल्सकडून माझ्या प्रतिष्ठेचे केले जाणारे चारित्र्यहनन मला अस्वस्थ करणारे आहे. माझं नाव आणि माझी प्रतिष्ठा तयार करण्यासाठी मी अनेक वर्षे परिश्रम घेतले आहेत. माझं मौन दुर्बलतेचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे. नकारात्मकता अगदी सहज पसरवली जात असताना इतरांना पुढे घेऊन जाण्यासाठीट धैर्याची गरज असते असे धनश्रीने म्हटलं होतं.

follow us