Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चा, धनश्रीने ट्रोलर्सना फटकारलं, म्हणाली, “माझं मौन हे..”
Dhanashree Verma : टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल सध्या (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कारण त्याची पत्नी धनश्री वर्मासोबत तो (Dhanashree Verma) घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाहीत, तेव्हापासून या बातम्यांना हवा मिळत आहे. यानंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आणि लग्नाचे काही फोटोही डिलीट केले. या अफवांमध्ये युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडीओ पाहून चाहते विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. धनश्रीसोबतच्या नात्यामुळे त्याची अवस्था अशी झाली असल्याचे बहुतेकांचे म्हणणे आहे. यानंतर आता धनश्रीनेही एक पोस्ट शेअर करत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.
धनश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. निराधार लिखाण, कोणत्याही गोष्टीचं सत्य जाणून न घेणं आणि बिना चेहऱ्याच्या ट्रोल्सकडून माझ्या प्रतिष्ठेचे केले जाणारे चारित्र्यहनन मला अस्वस्थ करणारे आहे.
video : युजवेंद्र चहलची अवस्था पाहून नेटकऱ्यांमध्ये अस्वस्थता; त्या व्हायरल व्हिडोओची जोरदार चर्चा
माझं नाव आणि माझी प्रतिष्ठा तयार करण्यासाठी मी अनेक वर्षे परिश्रम घेतले आहेत. माझं मौन दुर्बलतेचं नाही तर ताकदीचं लक्षण आहे. नकारात्मकता अगदी सहज पसरवली जात असताना इतरांना पुढे घेऊन जाण्यासाठीट धैर्याची गरज असते असे धनश्रीने म्हटलं आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युजवेंद्र चहल मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. त्याला नीट चालताही येत नाही. काही लोक त्याला पकडून गाडीत बसवत आहेत. वैयक्तिक आयुष्यातील चढउतारामुळे चहलची अशी अवस्था झाल्याचा दावा केला जात आहे. पण, हा दावा खरा मानता येणार नाही कारण हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट नाही. चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
युजवेंद्र चहलची क्रिकेट कारकीर्द
लेगस्पिनर युजवेंद्र चहलने जून 2016 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. टी-20 क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवल्यानंतर त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्येही स्थान मिळाले आणि तो टीम इंडियाचा स्टार स्पिनर बनला. मात्र, गेल्या एक ते दोन वर्षांत त्याच्या कामगिरीत घसरण झाली आहे आणि तो संघात आणि संघाबाहेर आहे. चहलने भारतासाठी 80 टी-20 आणि 72 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 217 विकेट्स आहेत.