Chala Hawa Yeu Dya: ‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनीवरील खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) गेल्या 9 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी हा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदम (Bhau Kadam) ते स्नेहल शिदमपर्यंत अशा सर्वच कलाकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले आहे. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘फूबाईफू’ हा लोकप्रिय कार्यक्रम बंद होण्याच्या अगोदर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम सुरू झाला होता. 2014 साली ‘लयभारी’ या सिनेमाच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील कलाकारांची मोठी टीम जमली होती. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना कायम खळखळून हसवण्याचं काम करत आहे. सुरुवातीला या कार्यक्रमाला प्रेक्षकाचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परंतु अलीकडे हा कार्यक्रम खूपच सुमार होत चालल्याची प्रेक्षकांची तक्रार होती.
तसेच ‘होऊ दे व्हायरल’, ‘सेलिब्रिटी पॅटर्न’, ‘लहान तोंडी मोठा घास’, अशा अनोख्या ढंगाने चाहत्यांचे पुन्हा कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. परंतु याला काही जास्त यश मिळाले नाही. ‘चला हवा येऊ द्या’ची लोकप्रियता खूपच ओसरली आहे. यामुळे टीआरपी देखील घसरत चाला आहे. यामुळे आता ‘झी मराठी’ वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. येत्या आठवड्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Anupam Kher: अनुपम खेर यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाले…
एका वृत्तसंस्थेशी बोलत असताना अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे म्हणाले आहेत की, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरी देखील प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहणार आहे. गेली 9 वर्षे 1 हजारहून जास्त भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिल्याचे यावेळी अभिनेत्याने सांगितले आहे. तूर्तास थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा 7- 8 महिन्यांनी नवे पर्व सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.