टीआरपीच्या शर्यतीत झी मराठीचा ‘मास्टरस्ट्रोक’! प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘या’ मालिकांचा भव्य महासंग्राम

Zee Marathi ने बिग बॉस मराठीला थेट टक्कर देण्यासाठी हुकमी एक्का बाहेर काढला. लोकप्रिय मालिकांचा भव्य महासंग्राम प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Zee Marathi

Zee Marathi

Zee Marathi’s ‘masterstroke’ in the TRP race! The grand battle of Serial presented to the audience : सध्या सर्वच माध्यमांवर ‘बिग बॉस मराठी सीझन 6’ ची जोरदार चर्चा सुरू आहे. हा सीझन कसा असेल, यंदा कोणते चेहरे घरात झळकणार, कोणता नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणारयावर सोशल मीडियापासून मनोरंजन विश्वात चर्चांचा धुरळा उडालेला आहे.

Agniveers New Rules : अग्निवीरांसाठी नवीन नियम! पर्मनंट सैनिक होण्यापूर्वी करता येणार नाही लग्न

5 जानेवारी रोजी मुंबईत बिग बॉस मराठी सीझन 6 ची भव्य प्रेस कॉन्फरन्स पार पडली. यावेळी मागील पर्वाप्रमाणेच यंदाही शोचं सूत्रसंचालन करणारे अभिनेता रितेश देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यंदाचं पर्व पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व विक्रम मोडणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कलाटेंच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडच्या बहुचर्चित प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपचा प्रचाराचा नारळ फुटणार…

दरम्यान, पुढील रविवारपासून रात्री 8 वाजता बिग बॉस मराठी सीझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, यंदा तब्बल 100 दिवसांचा हा धमाकेदार प्रवास पाहायला मिळणार आहे. मात्र, या टीआरपीच्या महासंग्रामात इतर वाहिन्यांनीही कंबर कसली आहे.

झी मराठीचा हुकमी एक्का!

बिग बॉस मराठीला थेट टक्कर देण्यासाठी झी मराठीने आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मीनिवास’ आणि ‘कमळी’ यांचा भव्य महासंग्राम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच झी मराठीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, रात्री 8 वाजता मालिकांचा महासंग्राम पाहायला मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. 11 जानेवारीपासून हा विशेष महासंग्राम सुरू होणार असला, तरी तो नेमका किती दिवस चालणार याबाबत मात्र वाहिनीकडून अद्याप सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.

टीआरपीची खरी लढत आता सुरू!

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 6 च्या वाढत्या लोकप्रियतेला आव्हान देण्यासाठी झी मराठीने आखलेली ही रणनीती कितपत यशस्वी ठरेल? या महासंग्रामामुळे बिग बॉसच्या टीआरपीवर खरोखरच परिणाम होईल का? या टीआरपीच्या रणांगणात खरी रंगत आता सुरू झाली आहे, आणि याचा निकाल येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होणार आहे. 

Exit mobile version