अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना हटके लूक केला होता. त्यांच्या साडीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. 2023-24 चा अर्थसंकल्प लाल रंगाच्या संबलपुरी सिल्क साडीत सादर केला, ज्याला टेम्पल साडी देखील म्हटलं जातं.
2 / 5
2022 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कॉफी कलरची साडी नेसली होती. ज्यावर सोनेरी रेषा होत्या. या साडीला बोमकाई किंवा सोनपुरी साडी असंही म्हणतात.
3 / 5
2021 मध्ये निर्मला सीतारामन यांनी बंगालची प्रसिद्ध पोचमपल्ली साडी नेसली होती. ही साडी ऑफ व्हाईट रंगाची होती आणि त्या साडीला लाल प्रिंटेड बॉर्डर होती.
4 / 5
2020 मध्ये अर्थमंत्र्यांची साडी चांगलीच चर्चेत होती. त्यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती. त्यां साडीला सोनेरी काठ होते.
5 / 5
2019 मध्ये निर्मला सीतारमण यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी गडद गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी नेसली होती आणि या साडीवर गोल्डन बॉर्डर होती.